एशिया कप (Asia Cup) 2022च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना रविवारी (28 ऑगस्ट) दुबई येथे खेळला गेला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून एक विक्रम थोडक्यात मुकला तर एक विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) फलंदाजीवेळी संघर्ष करताना दिसला. हा सामना जरी भारताने जिंकला असला तरी रोहितने लवकरच त्याची विकेट गमावली. याबरोबर तो विश्वविक्रम करण्यापासून थोडक्यात मुकला आहे. तो पाकिस्तान विरुद्ध 12 चेंडूत 18 धावा करताच बाद झाला. त्याने आणखी एक धाव जरी केली असती तर त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला असता.
रोहितने आतापर्यंत 133 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 3499 धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तान विरुद्ध आणखी एक धाव केली असती तर तो पुरूष क्रिकेमध्ये सर्वाधिक असे 3500 धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला असता. त्याच्याआधी महिलांच्या क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या सूजी बेट्स हीने हा विक्रम केला आहे.
रोहितचा एक विक्रम मुकला असला तरी दुसरा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. तो एशिया कपच्या भारताकडून सर्वाधिक हंगामांमध्ये खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तो सातवा एशिया कपचा हंगाम खेळता आहे. तर त्याच्यापेक्षा अधिक एशिया कपचे हंगाम एमएस धोनी याने खेळले आहेत. त्याने सहा हंगाम खेळले आहेत. धोनीव्यतिरिक्त अजून काही भारतीय खेळाडू एशिया कपचे सहा हंगाम खेळले आहेत, मात्र सातवा हंगाम खेळणारा रोहित हा एकटाच भारतीय खेळाडू आहे.
रोहितने 2018च्या एशिया कपमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. त्यावेळी भारताने विजेतेपदही जिंकले होते. तर त्याने 6 सामन्यात भारताचे एशिया कपमध्ये नेतृत्व केले आहेत. ते सहाही सामने भारताने जिंकले आहेत.
महत्वाच्या बातम्या-