Rohit-Hardik Controversy: 1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारत आणि पाकिस्तान अ गटात असून 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे आयोजित करत आहेत. 5 जानेवारीला संध्याकाळी विश्वचषकाचे वेळापत्रक येताच भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. टी 20 विश्वचषकाचे अधिकृत प्रसारक असलेल्या स्टार स्पोर्ट्सने एक पोस्टर शेयर केला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचे हे पोस्टर सोशल मीडियावर अपलोड होताच रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या याचे चाहते पुन्हा एकदा एकमेकांना भिडले आहेत.
पोस्टरमध्ये पाकिस्तानचा नवनियुक्त टी20 कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी याच्यासोबत हार्दिक पंड्या याचा फोटो लावण्यात आला आहे. हेच वादाचे खरे मूळ आहे. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विश्वचषकासाठी बीसीसीआयने हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्याची चर्चा सुरू झाली आहे. रोहित शर्मा याला टी20 विश्वचषक संघात स्थान मिळणार नाही, अशीही चर्चा सुरू आहे. आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून निवडले आहे, त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले गेले. (rohit sharma missing t20 world cup poster hardik pandya replaced india vs pakistan t20 world cup)
It's the game we've all been waiting for! ????#TeamIndia takes on #Pakistan in the #T20WorldCup2024 in New York! ????
It can't get any better than this! ????Will ???????? claim their 7️⃣th T20 WC victory over their arch rivals?#Cricket pic.twitter.com/a8BDiIZFJ4
— Star Sports (@StarSportsIndia) January 5, 2024
मात्र, ही स्पर्धा सुरू होण्यास अजून सहा महिन्यांचा अवधी आहे, त्यामुळे टी20 विश्वचषकासाठी संघ कसा असेल हे सांगता येत नाही. कोणाला जागा मिळणार?, कर्णधारपद कोण सांभाळणार?. यावेळचा विश्वचषक अनेक अर्थांनी खास असणार आहे. या स्पर्धेत प्रथमच 20 संघ सहभागी होत असून, त्यांची चार वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतातील बहुतेक सामने रात्री 8:30 वाजता सुरू होणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने गयाना आणि त्रिनिदाद येथे 26 आणि 27 जून रोजी खेळवले जातील, तर 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना खेळला जाईल. (A new controversy erupted Rohit missing from IND vs PAK match poster Hardik to captain in T20 World Cup?)
हेही वाचा
Rashid Khan: टी20 संघात असूनही राशिद खान भारताविरुद्ध का खेळणार नाही?, मोठे कारण आले समोर, वाचाच
T20 Future of Rohit-Virat: जय शहाच रोहित-विराटचं टी20 भविष्य ठरवू शकतात, घेऊ शकतील ‘हा’ मोठा निर्णय






