भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या डावात यजमान ऑस्ट्रेलियानं मोठी धावसंख्या उभारली. कांगारू संघानं पहिल्या डावात 445 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तिसऱ्या दिवशीही मोकळेपणानं खेळण्याची संधी दिली. यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषत: समालोचन करणारे अनेक माजी भारतीय क्रिकेटपटू हे प्रश्न उपस्थित करत आहेत.
या सामन्यात रोहित शर्मानं कर्णधार म्हणून तीन मोठ्या चुका केल्या, ज्याचे परिणाम भारतीय संघाला भोगावे लागले. त्या कोणत्या चुका आहेत, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
(3) आक्रमक फील्ड सेट केली नाही – दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा कर्णधार रोहित शर्मानं अतिशय बचावात्मक वृत्ती स्वीकारली. त्यानं क्षेत्ररक्षकांना फलंदाजांच्या जवळ लावलं नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांवर कोणतंही दडपण आलं नाही आणि त्यांनी मुक्तपणे फलंदाजी केली. रोहित शर्मानं स्लिपमध्येही एकच खेळाडू लावला होता, ज्याचा पुरेपूर फायदा कांगारू फलंदाजांनी घेतला.
(2) खेळाडूंना प्रोत्साहन दिलं नाही – ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा खेळाडूंमध्ये अजिबात उत्साह दिसत नव्हता. सर्वांचे खांदे झुकलेले होते. मैदानात कोणताही खेळाडू जास्त बोलत नव्हता आणि खेळ अगदी शांतपणे चालू होता. भारतीय खेळाडूंचे हे हावभाव पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित भारतीय समालोचकांनाही आश्चर्य वाटलं. कर्णधार रोहित शर्मा आपल्या खेळाडूंना अजिबात प्रोत्साहन देत नसल्याचं त्याचं मत होतं.
(1) एका टोकावरून फिरकी गोलंदाजांना लावलं – जेव्हा कसोटी सामन्यात दिवसाचं पहिलं सत्र असतं, तेव्हा दोन्ही बाजूंनी वेगवान गोलंदाज गोलंदाजी करतील अशी अपेक्षा असते. मात्र, कर्णधार रोहित शर्मानं एका टोकाकडून फिरकीपटू रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी आणलं. याचा पुरेपूर फायदा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी घेतला. त्यांनी जडेजावर हल्ला चढवला आणि भरपूर धावा केल्या. मोहम्मद सिराजऐवजी जडेजाला गोलंदाजी देण्याच्या रोहित शर्माच्या निर्णयाचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराहचा ऑस्ट्रेलियात जलवा, लवकरच मोडणार कपिल देवचा मोठा रेकॉर्ड
फॅब 4 च्या शर्यतीत खूप मागे पडला ‘किंग’, एकेकाळी होतं निर्विवाद वर्चस्व!
वारंवार तेच! विराट कोहलीची पुन्हा तीच चुकी, अत्यंत खराब शॉट खेळून बाद