आयपीएल २०२०मधील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना मुंबईने ५७ धावांनी जिंकला. नाणेफेक जिंकत दिल्लीने मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५ विकेट्स गमावत २०० धावांचा भलामोठा डोंगर दिल्ली संघासमोर उभा केला होता. परंतु या धावा करताना संघाचा कर्णधार रोहित शर्माला खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रोहितला ट्रोल केले आहे.
रोहित शर्माला केले ट्रोल
मुंबई संघासाठी हा आयपीएल हंगाम चांगला असला, तरीही रोहित शर्मासाठी हा हंगाम खराब ठरत आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित आपल्या पहिल्याच चेंडूवर पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ झाला. त्यामुळे त्याला चाहत्यांनी ट्विटरवर जोरदार ट्रोल केले आहे.
शून्यावर बाद होण्याची १३ वी वेळ
रोहितला फिरकीपटू आर अश्विनने शून्यावर पायचीत बाद केले. रोहितची आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही १३ वी वेळ आहे. त्यामुळे त्याने आता आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणाच्या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या पार्थिव पटेल आणि हरभजन सिंगची बरोबरी केली आहे. पार्थिव आणि हरभजन देखील प्रत्येकी १३ वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.
https://twitter.com/adam_styris/status/1324398416365932545
https://twitter.com/RaWadiDev/status/1324373077484924928
https://twitter.com/SayNoToMediocre/status/1324373458734641152
https://twitter.com/Aageyse_Left/status/1324373530872438787
https://twitter.com/yash_eu/status/1324373925015429124
सन २०१८ पासून रोहितची गोल्डन डकवर (पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद) बाद होण्याची ही चौथी वेळ होती. २०१८ पूर्वी रोहित एकदाही गोल्डन डकवर बाद झाला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्स सगळ्यांनाच नडली, पण ‘ही’ दोन ठिकाणं कर्णधार रोहितलाच नडली
-IPL – मुंबई इंडियन्स सहाव्यांदा फायनलमध्ये दाखल; दिल्लीविरुद्ध मिळवला दणदणीत विजय
-मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी रोहित शर्मा सोडणार का सलामीची जागा ?
-“रोहितची पुन्हा तंदुरुस्ती चाचणी घेण्यात गैर नाही”, माजी दिग्गजाचे रोखठोक मत
-संघात स्थान देण्यासाठी एकेकाळी वडिलांकडे मागितली लाच, खुद्द विराटनेच केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-






