---Advertisement---

धावांचा पाऊस पडणार, इतिहास घडणार! ‘एवढ्या’ धावा करताच रोहित वनडेत बनणार ‘दस’ हजारी मनसबदार

AUS ROHIT Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ शनिवारी (2 सप्टेंबर) आशिया चषकात आपल्या अभियानाची सुरुवात करेल. श्रीलंकेतील पल्लेकल येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर सर्वांची खास नजर असेल. रोहितकडे हा सामना तसेच या संपूर्ण स्पर्धेदरम्यान एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरेल. हा सामना तसेच या संपूर्ण स्पर्धेदरम्यान रोहितकडे आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे. रोहितला यासाठी केवळ 163 धावांची गरज असून, तो हा विक्रम आपल्या नावे करू शकतो.

रोहितला या स्पर्धेत जास्तीत जास्त सहा सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तो‌ हा कारकिर्दीतील मैलाचा दगड गाठू शकतो. पाकिस्ताननंतर भारतीय संघ नेपाळविरुद्ध दुसरा साखळी सामना खेळेल. तर, सुपर फोरमध्ये भारताला तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केल्यास रोहितला एक जास्त सामना खेळायला मिळेल.

रोहितच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने वनडे क्रिकेटमध्ये 244 सामने खेळताना 48.6 च्या सरासरीने 9837 धावा केल्या आहेत. रोहित हा आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. भारताकडून यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव‌ गांगुली, एमएस धोनी व विराट कोहली यांनी दहा हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

(Rohit Sharma Need 163 Runs For Score 10000 In ODI Chance In Asia Cup)

हेही वाचाच-
लंकन सिहांनी शांत केले बांगला टायगर्स! श्रीलंकेची शानदार विजयाने सुरुवात
IPL फायनलमध्ये CSKचा घाम काढणाऱ्या खेळाडूचा मोठा निर्णय, विदेशी संघासोबत केला ‘एवढ्या’ सामन्यांचा करार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---