मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आज (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२०चा दहावा सामना खेळला जाणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे हा सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला एक खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
२००८पासून आयपीएलचा भाग असलेल्या रोहितने आतापर्यंत १९० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३१.७८च्या सरासरीने ४९९० धावा केल्या आहेत. जर रोहितने आज बेंगलोरविरुद्ध फक्त १० धावा ठोकल्या, तर तो आयपीएल इतिहासात ५००० धावांचा आकडा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दाखल होईल.
आजवर केवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा फलंदाज सुरेश रैना यांनी हा कारनामा केला आहे. विराट त्याच्या १७९ सामन्यातील ५४२७ धावासंह या यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. तर रैनाने १९३ सामन्यात ५३६८ धावा करत या यादीत दूसरा क्रमांक पटकावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘राजस्थान विरूद्ध पंजाब’ सामना आयपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, कारणंही आहे तसंच
राजस्थानविरुद्ध चौफेर फटकेबाजी करत ‘हा’ अवलिया झाला दूसऱ्या स्थानी विराजमान, वाचा सविस्तर
हार्दिक पंड्या कधी करणार गोलंदाजी? पाहा झहीर खानने काय सांगितले
ट्रेंडिंग लेख-
‘या’ पाच कारणांमुळे राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर मिळवला ऐतिहासिक विजय
जेसन होल्डर ४ वर्षांनी उतरणार आयपीएलच्या मैदानात, जाणून घ्या त्याच्याबद्दल ३ खास गोष्टी
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज






