जगातील सर्वात लोकप्रिय टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. चिक्कार पैसा, खेळाडूंना मिळणारी प्रसिद्धी, वेगवेगळ्या देशातील क्रिकेट संघांच्या युवा आणि दिग्गज खेळाडूंची भरमार या गोष्टी आयपीएलची विशेषता वाढवतात. महत्त्वाचे म्हणजे, जरी आयपीएलमध्ये एकाहून एक खतरनाक परदेशी खेळाडू असले, तरी भारतीय खेळाडूंनी तिथेही त्यांचे वेगळेपण जपले आहे.
काल (२७ सप्टेंबर) शारजाह येथे आयपीएल २०२०चा नववा सामना पार पडला. राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानने ४ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. असे असले तरी, पंजाब संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल हा कालच्या या सामन्याचा स्टार खेळाडू ठरला.
या सामन्यात मयंकने दमदार फटकेबाजी करत फक्त ४५ चेंडूत १०० धावांची अफलातून खेळी केली. यात त्याच्या ९ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. यासह मयंक आयपीएल इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दूसऱ्या स्थानावर आला आहे.
मयंकच्या पुढे या यादीत अष्टपैलू खेळाडू यूसुफ पठान हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याने २०१० साली मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केवळ ३७ चेंडूत शतकी खेळी केली होती. तर मुरली विजयनेही २०१०मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध केवळ ४६ चेंडूत १०० धावा कुटल्या होत्या. तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे.
मयंकने आतापर्यंत आयपीएलमध्ये ८० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७५ डावात फलंदाजी करताना १४९१ धावांची नोंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके’ म्हटली की, आता सर्वांच्या तोंडात येणार ‘या’ २ संघांची नावे
आज बेंगलोर-मुंबई आमने-सामने; जाणून घ्या सामन्याबद्दल सविस्तर माहिती
संजू सॅमसनने निवड समितीला दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाला अजून दहा वर्ष…
ट्रेंडिंग लेख-
‘या’ पाच कारणांमुळे राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर मिळवला ऐतिहासिक विजय
असे २ भारतीय फलंदाज, ज्यांनी वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधीच आयपीएलमध्ये ठोकलेत सर्वाधिक अर्धशतके
जेसन होल्डर ४ वर्षांनी उतरणार आयपीएलच्या मैदानात, जाणून घ्या त्याच्याबद्दल ३ खास गोष्टी






