वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतीय संघासमोर 273 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने वादळी शतक ठोकले. यासह त्याने विश्वचषक इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. यानंतर आता रोहितचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे.
अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत 273 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. त्याचा पाठलाग करताना भारताला रोहित व ईशानने 18.4 षटकात 156 धावांची सलामी दिली. रोहितने केवळ 63 चेंडूमध्ये आपले शतक झळकावले.
People have questioned whether I deserve to be on the team for the world cup, I prefer to answer with my bat 🙂 🙂
— Rohit Sharma (@ImRo45) April 17, 2010
मागील वेळी भारतात 2011 मध्ये वनडे विश्वचषक खेळला गेला होता. त्या संघात रोहितचा समावेश होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापनाने अतिरिक्त फिरकीपटू म्हणून पियुष चावला याला संधी दिली. भारतीय संघाने हा विश्वचषक आपल्या नावे केला होता. या विश्वचषकानंतर रोहितने एक ट्विट केले होते. यामध्ये त्याने लिहिले होते, “मी विश्वचषकासाठी संघात राहण्यास पात्र आहे का असा प्रश्न लोकांनी केला आहे, मी माझ्या बॅटने उत्तर देणे पसंत करतो.”
यानंतर रोहित शर्मा याने 2013 मध्ये सलामीवीर म्हणून भारतीय संघातील आपली जागा पक्की केली. 2015 विश्वचषकात त्याने भारतासाठी सलामी दिली. 2019 विश्वचषकात त्याने तब्बल 5 शतके ठोकली. त्यानंतर आता तो थेट भारतीय संघाचा कर्णधार म्हणून हा विश्वचषक खेळतोय. त्यामुळे त्याने बारा वर्षांनंतर आपण केलेले ट्विट खरे सिद्ध करून दाखवले. (Rohit Sharma Old Tweet Goes Viral After Century Against Afghanistan)
महत्वाच्या बातम्या –
रोहितकडून सचिन मोठा विश्वचषक विक्रम मोडीत, खास यादीत केली ऑस्ट्रेलियन दिग्गजाची बरोबरी
रोहित विराटला सोडा, सचिनच्या मते ‘हा’ आहे भारताचा योद्धा खेळाडू, म्हणाला…