---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध हिटमॅनसमोर 5 मोठे विक्रम रचण्याची संधी! इतिहास घडवण्यापासून अवघ्या काही धावा दूर

On: रविवार, जुलै 12, 2026 8:59 PM
---Advertisement---

टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका पराभूत झाल्यानंतर आता 3 वनडे सामने खेळणार आहे. (Odi series between IND vs ENG) या मालिकेत स्टार खेळाडू पुन्हा एकदा ‘ब्लू जर्सी’मध्ये दिसणार आहेत. यादरम्यान सर्वांचे लक्ष टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर असेल. ‘हिटमॅन’ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

त्यामुळे, इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेदरम्यान तो 5 मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो. त्यामुळे रोहित इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे.

जर रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत शतक झळकावले, तर तो वनडे फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज ठरेल. सध्या रोहित शर्मा 39 वर्षांचा आहे.

जर दिग्गज रोहितने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 280 धावा केल्या, तर तो वनडे कारकिर्दीत 12 हजार धावा पूर्ण करेल. रोहित वनडे फॉरमॅटमध्ये मोठ्या खेळी खेळण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे तो 3 डावांत इतक्या धावा सहज करू शकतो.

पहिल्या वनडे सामन्यात एक षटकार मारताच रोहित शर्मा एक मोठा विक्रम आपल्या नावे करू शकतो. जर त्याने असे केले, तर तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरेल. इंग्लंडविरुद्ध रोहितची कामगिरी नेहमीच उत्कृष्ट राहिली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या या वनडे मालिकेत जर रोहित शर्माने 69 धावा केल्या, तर तो ‘सेना’ (ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड) देशांमध्ये 9 हजार धावा करणारा पहिला आशियाई सलामीवीर ठरेल. सलामीवीर म्हणून रोहितने या देशांत शानदार कामगिरी केली आहे.

इंग्लंडविरुद्ध 49 धावा करताच रोहित शर्मा एक मोठा विक्रम प्रस्थापित करेल. रोहितकडे सलामीवीर म्हणून सामने जिंकताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. रोहित जेव्हा-जेव्हा मोठी धावसंख्या उभारतो, तेव्हा टीम इंडियाच्या विजयाची शक्यता वाढते. त्यामुळे टी-20 मालिका पराभवाचा बदला रोहित-विराट मिळून इंग्लंडकडून घेणार याची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---