सध्या अनेक सेलिब्रेटी इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ चॅट करताना दिसून आले आहेत. यामध्ये विविध देशांच्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. नुकतेच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसन आणि भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानेही असेच एक चॅट सेशन केले होते.
यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२०साठीचा संघ, सचिन तेंडुलकरचा सलामीवीर म्हणून पडलेला प्रभाव, प्रशिक्षक असे अनेक विषयांवर चर्चा केली. यामध्ये रोहितने असेही सांगितले की रिकी पाँटिंग हा सर्वोत्तम प्रशिक्षक होत्या, ज्याच्या मार्गदर्शनाखाली तो मुंबई इंडिन्सकडून खेळला.
रोहित त्याच्या आवडत्या प्रशिक्षकाबद्दल बोलताना म्हणाला, ‘सर्वांनीच काहीतरी योगदान दिले आहे त्यामुळे त्यातील एकाची निवड करणे अवघड आहे. पण माझ्यामते रिकी पाँटिंगमध्ये जादू होती. तो जेव्हा संघाचा कर्णधार होता तेव्हा त्याने ज्याप्रकारे संघाला सांभाळले आणि मग कर्णधारपद मला दिले. यासाठी खूप हिंमत लागते.’
तसेच रोहित म्हणाला, ‘त्यानंतरही तो सपोर्ट स्टाफमध्येही सहभागी होता. त्याने सर्व युवा खेळाडूंना मदत केली आणि मला माझ्या कर्णधारपदासाठी मार्गदर्शनही केले. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो. तो एक वेगळाच आहे.’
"He guided me a lot when I was handed over the captaincy!"
Who is @imro45's favourite coach? Watch to find out 🤔#OneFamily pic.twitter.com/GIxbhx2RHi
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2020
२०१३ च्या आयपीएल मोसमादरम्यान अर्ध्यातच पाँटिंगने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर रोहितने मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी हाती घेतली. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३,२०१५,२०१७ आणि २०१९ ला आयपीएलचे विजेतेपद मिळवले.
ट्रेंडिंग घडामोडी –
दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय
मला जसा पाठिंबा गांगुलीने दिला तसा पाठिंबा धोनी-विराटने दिला नाही- युवराज