न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म कायम आहे. आता तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित फक्त 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला मॅट हेन्रीनं बाद केलं.
रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सातत्यानं धावा काढण्यासाठी धडपडत आहे. या मालिकेतील त्याची आकडेवारीही अत्यंत धक्कादायक आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्मानं केवळ 2 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्यानं 52 धावा केल्या. अशाप्रकारे बंगळुरू कसोटीत रोहित शर्मानं एकून 54 धावा केल्या.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी पुण्यात खेळली गेली. पुणे कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्मा खातंही न उघडता बाद झाला. यानंतर तो दुसऱ्या डावात केवळ 8 धावा करू शकला. अशाप्रकारे पुणे कसोटीच्या दोन्ही डावात रोहित शर्माच्या बॅटमधून केवळ 8 धावा निघाल्या.
आता भारत-न्यूझीलंड मालिकेतील तिसरी कसोटी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्मा 18 धावा करून बाद झाला. या मालिकेत रोहित शर्मानं आतापर्यंत 5 डावात केवळ 80 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या या खराब फॉर्मचे परिणाम भारतीय संघालाही भोगावे लागले आहेत. किवी संघानं पहिल्या दोन कसोटीत भारताचा दारुण पराभव केला. यासह टीम इंडियानं घरच्या मैदानावर तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमावली आहे.
रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्यानं भारतासाठी आतापर्यंत 64 कसोटी सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्यानं 42.60 च्या सरासरीनं 4260 धावा केल्या आहेत. रोहितनं कसोटीत 12 शतकांव्यतिरिक्त 50 धावांचा आकडा 18 वेळा पार केला आहे. तसेच त्यानं कसोटी फॉरमॅटमध्ये द्विशतकही झळकावलं आहे. या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माची सर्वोच्च धावसंख्या 212 आहे.
हेही वाचा –
रोहित शर्माची पोकळी हा सलामीवीर कशी भरून काढणार? ऑस्ट्रेलियात होतोय पूर्णपणे फ्लॉप!
सरफराज खानवर चिडलेल्या किवी फलंदाजांची अंपायरकडे तक्रार, रोहित-कोहलीनं सांभाळलं प्रकरण
पाकिस्तानकडून भारताचा पराभव, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक; अवघ्या 5 षटकात ठोकल्या 121 धावा!