भारत आणि अफगाणिस्तानमधील तिसरा टी-20 सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. भारताने या सामन्यात दोन सुवर ओव्हर खेळल्यानंतर विजय मिळवला. रोहित शर्मा या सामन्यात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आणि सामनावीर पुरस्कार देखील त्यालाच दिला गेला. रोहितने केलेल्या शतकी खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून एक असा शॉट निघाला, जो शक्यतो कर्णधार याआधी खेळताना दिसला नाहीये. विजयानंतर रोहितने या षटकराविषयी खास प्रतिक्रिया देखील दिली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्मय घेतला. 20 षटकात भारताने 4 विकेट्सच्या नुकसानावर 212 धावांपर्यंत मजल मारली. यात एकट्या रोहितने 121* धावांची वादळी खेळी केली. यासाठी कर्णधाराने एकूण 69 चेंडू खेळले, ज्यामध्ये 11 चौकार आणि 8 षटकार मारले. यादरम्यान त्याने दोन रिव्हर्स स्वीप शॉट्स देखील मारले. यापैकी एक चौकार तर एक षटकार गेला. रोहितने मारलेल्या या रिव्हर्स स्वीप शॉट्सची चांगलीच चर्चा होत आहे. एका चाहत्याने स्टॅन्डमधून त्याने रिव्हस स्वीपवर मारलेल्या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Chinnaswamy crowd reaction on Rohit Sharma’s reverse sweep…!!! 🔥pic.twitter.com/oIkFJvO8Vn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2024
THE MADNESS OF ROHIT SHARMA…!!!!
– What a reverse sweep shot by The Hitman. 🐐 pic.twitter.com/TykBQb4WX8
— CricketMAN2 (@ImTanujSingh) January 17, 2024
दरम्यान, रोहितचा व्हायरल होत असलेला शॉट खेळणे कर्णधारासाठी वाटते तितके सोपे नक्कीच नव्हते. विजयानंतर रोहितने स्वतः सांगितले की, तो या शॉटसाठी दोन वर्ष सराव करत होता. कर्णधार म्हणाला, “फिरकीपटूंवर दबाव बनवण्यासाठी असे शॉट्स खेळले जातात. इथे फिरकी गोलंदाजांविरुद्ध समोरच्या बाजूला शॉट्स खेळणे कठीण होते. त्यामुळेच मी काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत होतो आणि त्यामुळेच हा शॉट खेळला. मागच्या दोन वर्षांपासून मी या शॉटचा सराव करत आहे.”
Rohit Sharma said “I have been practicing reverse sweep and switch hit for the past 2 years & when I saw today the ball is spinning today then I played today – you will have to keep your options open in T20 cricket”. [Jio Cinema] pic.twitter.com/ZkdpGFKPm5
— Johns. (@CricCrazyJohns) January 18, 2024
उभय संघांतील हा सामना जिंकण्यासाठी भारताकडून अफगाणिस्तानला 213 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तानने 20 षटकात बरोबर 212 धावा केल्या आणि सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये देखील दोन्ही संघांनी प्रत्येकी 16-16 धावा केल्या आणि सामना पुन्हा एकदा टाय झाला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र भारताने प्रथम फलंदाजी करताना 11 धावा केल्या. प्रत्युत्तार अफगाणिस्तान संघ अवघी एक धाव करू शकला. मालिकेतील भारताला मिळालेला हा सलग तिसरा विजय असून अपगाणिस्तानला क्लीन स्वीप मिळाला. (Rohit Sharma practiced for two years for his reverse sweep against Afghanistan)
महत्वाच्या बातम्या –
Australian Open 2024 : सुमितने ऑस्ट्रेलियात गाजवले मैदान, तब्बल 35 वर्षांनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
Virat Kohli । नको तेच झालं, पहिल्यांदाच विराटवर ओढावली ‘ही’ नामुष्की