भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टी20 विश्वचषकानंतर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर तो भारतीय संघाचा भाग झाला नाही. पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या बांगलादेश दौऱ्यावर तो पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. बांगलादेशला रवाना होण्यापूर्वी रोहित नुकताच सराव करताना दिसून आला. ज्याची छायाचित्र त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.
भारतीय क्रिकेट संघ 4 डिसेंबरपासून बांगलादेशमध्ये तीन सामन्यांची वनडे तसेच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या मालिकांसाठी भारताने आपला मजबूत संघ घोषित केला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावरून माघार घेतलेले सर्वच प्रमुख खेळाडू बांगलादेश दौऱ्यावर पुनरागमन करतील. कर्णधार रोहित शर्मादेखील जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर मैदानावर दिसेल.
Ending your day with a ???? that will make you smile ????#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/0rQW9ydcg7
— Mumbai Indians (@mipaltan) November 25, 2022
बांगलादेशला रवाना होण्यापूर्वी रोहित मुंबई येथे सराव करताना दिसला. यामध्ये तो फलंदाजी करताना दिसतोय. त्याने या छायाचित्रांना ’इन द झोन’ असे कॅप्शन दिले आहे. रोहित या छायाचित्रात आपला आवडता पुल शॉट खेळताना देखील दिसून येतोय.
काही दिवसांपूर्वीच रोहितची जिममधील छायाचित्रे व्हायरल झाली होती. रोहित आणखी तंदुरुस्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील सांगण्यात आलेले. आता या नव्या सरावाच्या छायाचित्रांमध्ये रोहित पहिल्यापेक्षा अधिक बारीक झाल्याचे दिसून येत आहे. रोहित लवकरच आपल्या जुन्या फॉर्ममध्ये येईल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना असेल.
रोहितला टी20 विश्वचषकात अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. केवळ नेदरलँडविरुद्ध तो अर्धशतकी खेळी करू शकलेला. भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्यानंतर, आता भारतीय संघाचा टी20 कर्णधार बदलला जावा अशी मागणी होताना दिसतेय. असे झाल्यास रोहित केवळ कसोटी व वनडे संघाचा कर्णधार राहील.
(Rohit Sharma Practicing Ahead Bangladesh Tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: टीम इंडिया पोहोचली हॅमिल्टनला, बसमधून उतरताच अर्शदीपने केला भांगडा; व्हिडिओ व्हायरल
अर्जेंटिनाला पराभूत केल्याने ‘राजा’ भलताच खूष! सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडूला रोल्स रॉयस ‘गिफ्ट’






