---Advertisement---

रिषभच्या लक्षणीय खेळीने हिटमॅनला पाडली भुरळ; म्हणाला, “पंत धोनीची जागा घेण्यास पूर्णपणे सज्ज”

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस रिषभ पंतने गाजवला. अहमदाबादच्या फलंदाजीस प्रतिकूल असलेल्या स्टेडियमवर त्याने षटकार-चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्या शतकी खेळीने भारतीय संघाचा डगमगता डाव सावरला. त्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमी पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले आहेत. केवळ क्रिकेटप्रेमीच नव्हे तर विस्फोटक सलामीवीर रोहित शर्माही त्याच्या खेळीचा चाहता बनला असून त्याने पंतचे तोंडभरून कौतुक केले आहे.

रोहित म्हणाला की, “पंतचे शतक अतिशय महत्त्वाचे ठरले, कारण जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता, तेव्हा संघाची परिस्थिती जास्त चांगली नव्हती. त्याने या खेळीदरम्यान त्याचा प्रत्येक पैलू आजमावला. त्याने सुरुवातीला हिम्मतीने फलंदाजी केली आणि नंतर संधी मिळताच आपले नैसर्गिक आणि आक्रमक शॉट खेळले. त्याच्यामुळेच संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे.”

सुंदर आणि पंतने केले गजब प्रदर्शन

आघाडीचे ५ फलंदाज परतल्यानंतर पंतने एकाकी झुंज देत संघाचा डाव सावरला. त्यानंतर अष्टपैलू आर अश्विनही १३ धावांवर झेलबाद झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर मैदानावर उतरला. त्याने संघाची स्थिती लक्षात घेता दुसऱ्या बाजूने पंतला भक्कम साथ दिली असून या दोघांमध्ये ७ व्या विकेटसाठी शतकी भागीदारीही झाली.

याविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “सुंदर आणि पंतने संघाच्या रणनितीनुसार योग्य फलंदाजी केली. त्यांना फलंदाजीपुर्वीच सांगण्यात आले होते की, पहिल्यांदा इंग्लंडचे लक्ष्य पूर्ण करा. त्यानंतर तुमचे नैसर्गिक शॉट खेळा. त्यांनी दोघांनी मिळून दमदार खेळी केली. पंतने स्वतला सिद्ध करून दाखवले आहे. आता तो माजी भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनीची जागा घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.”

भारतीय संघ आघाडीवर 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतापुढे अवघ्या २०६ धावांचे लक्ष्य उभारले होते. भारतीय संघ हे लक्ष्य अगदी सहजपणे पार करेल असे वाटत होते. परंतु आघाडीचे फलंदाज स्वस्तात आपली विकेट गमावून बसले. शुबमन गिल, कर्णधार विराट कोहली यांना तर भोपळाही फोडता आला नाही. रोहित शर्माने एकाकी झुंज दिली. मात्र तोही ४९ धावांवर पायचित झाला.

अखेर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी येत पंतने झुंजार शतकी खेळी केली. शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच जेम्स अँडरसनच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि २ षटकार मारले. तो बाद झाल्यानंतरही वॉशिंग्टन सुंदरने अक्षर पटेलला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला. दरम्यान, त्यानेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाखेर भारत ९४ षटकात ७ बाद २९४ धावांवर आहे. त्यांनी ८१ धावांची आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषक गाजवणारा परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप न पाडू शकणारा कायरन पॉवेल

चर्चा तर होणारच ना! रिषभ पंत, विरेंद्र सेहवागच्या धुवांधार फलंदाजीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

धक्कादायक! अनेक भारतीय धावपटूंच्या यशात मोलाचे योगदान देणारे प्रशिक्षक वसतिगृहात आढळले मृतावस्थेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---