आयपीएलमध्ये शुक्रवारी (16 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने 44 चेंडूत नाबाद 78 धावांची उत्कृष्ट खेळी केली. डि कॉकबरोबर फलंदाजी करायला आवडते असे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले. त्याचबरोबर या स्पर्धेत दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ अधिक विजय मिळवणार अशी भविष्यवाणीही त्याने केली.
विजयामुळे झाला आनंद
सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना रोहित म्हणाला की, “लक्ष्याचा पाठलाग करताना 8 गडी राखून मोठा विजय मिळवल्यामुळे आनंद झाला. या विजयामुळे आमच्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ होईल. या सामन्यात आम्ही पहिल्याच चेंडूपासून प्रभावी गोलंदाजी केली. माझा विश्वास आहे की या स्पर्धेत दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ आता अधिक सामने जिंकेल.”
रोहितचा डी कॉकला जोरदार पाठींबा
सामन्यात सलामीवीर रोहितने पहिल्या गड्यासाठी डी कॉकबरोबर 94 धावांची भागीदारी केली. तो म्हणाला, “मला डी कॉकबरोबर खेळायला आवडते. बहुदा तो आक्रमक फलंदाजी करतो आणि मला त्याला पाठींबा द्यायला आवडते.”
डी कॉकने केली उत्कृष्ट खेळी
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत पाच गडी गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईने हे लक्ष्य 16.5 षटकांत दोन गडी गमावून गाठले. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने नाबाद 78 धावांची खेळी केली. त्याने 44 चेंडूंचा सामना केला. त्याने या खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. सलामीवीर रोहित शर्माने 35 धावा केल्या. धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंड्याने नाबाद 21 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलमध्ये ‘असा’ नकोसा विक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय सलामीवीर
-व्वा रे मुंबईकर! दिल्लीविरुद्धचा सामना रोहित शर्मासाठी ठरला खूपच ‘खास’, कसं ते पाहा
-“माझी तुलना तीही रोहित शर्माशी…”, युवा पाकिस्तानी क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या मागील ३ हंगामातील रोहित शर्माची कामगिरी, घ्या जाणून
-अविश्वसनीय गुणवत्ता असूनही संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिलेला अंबाती रायडू
-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी