---Advertisement---

आयपीएलमध्ये रोहित ‘हिट’च! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला मुंबईकर, इतिहासात केवळ तिघांनी केलाय कारनामा

On: मंगळवार, एप्रिल 18, 2023 8:04 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 25वा सामना मंगळवारी (दि. 18 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात  हैदराबाद संघाने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने तिसऱ्याच षटकात आयपीएल कारकिर्दीतील एक मैलाचा दगड पार केला.

 

आयपीएलच्या या हंगामात रोहित मागील तीनही सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. या सामन्यात फलंदाजीला उतरल्यानंतर त्याच्यापुढे आयपीएलमध्ये 6000 धावा पूर्ण करण्याची संधी होती. तिसऱ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदर याच्या पहिल्या दोन चेंडूवर सणसणीत चौकार ठोकत त्याने हा पराक्रम गाठला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने चौकार मारत हॅट्रिक पूर्ण केली.

रोहितने 14 वी धाव करून आयपीएलमध्ये 6000 धावांचा हा टप्पा ओलांडला. रोहितने आजच्या सामन्यापूर्वी 231 सामन्यांत 1 शतक व 41 अर्धशतकांसह 5986 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये विराट कोहली (6844), शिखर धवन (6477) आणि डेव्हिड वॉर्नर (6109) यांनी 6 हजाराच्या वर धावा केल्या आहेत. त्यानंतर आता या मानाच्या यादीत रोहितचा देखील समावेश झाला. त्यानंतर विराटने 188 व शिखरने 200 डावांमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या होत्या. रोहित याने सर्वात संथ म्हणजे 227 डावांत इथपर्यंत मजल मारली.

आयपीएल डावांचा विचार केल्यास डेव्हिड वॉर्नर याने केवळ 165 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

हा मोठा विक्रम केल्यानंतर मात्र रोहित फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. सहा चौकारांच्या मदतीने त्याने 18 चेंडूवर 28 धावा केल्या. त्याला नटराजन याने झेलबाद केले.

(Rohit Sharma Reached 6000 Runs milestone In IPL After Virat Warner And Shikhar)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेवणासाठी तिलक वर्माच्या घरी पोहोचला मुंबईचा आख्खा संघ! स्वतः सचिननही होता उपस्थित
हृदय पिळवटून टाकणारी बातमी! क्रिकेट खेळताना युवकावर गोळीबार, पूर्ववैमनस्यातून हत्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---