जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पंजाब किंग्स (PBKS vs Mi) विरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईसाठी मोठी खेळी तर करू शकला नाही, पण त्याने बाद होण्याआधी टी 20 क्रिकेटमध्ये एक खास टप्पा पार केला आहे. रोहित शर्मा 21 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारून 24 धावा करून बाद झाला. हरप्रीत बरारने (harpreet barar) त्याला नेहाल वडेराच्या (Nehal wadhera ) हातून त्याचा कॅच घेतल्यामुळे रोहित बाद झाला. पंजाब किंग्स (punjab kings) विरुद्ध मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल 2025 (IPL 2025) च्या 69 व्या सामन्यात प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, कारण जो संघ सामना जिंकेल तो संघ टॉप 2 मध्ये प्रवेश करणार आहे.
रोहित शर्माने या सामन्यात 2 चौकार मारल्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1100 चौकार पूर्ण केलेले आहेत. रोहित असा कारनामा करणारा दुनियातील दहावा आणि तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या सामन्यात आधी रोहितच्या नावावर 460 सामन्यांच्या 447 डावांमध्ये 1098 चौकार होते. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 542 षटकार सुद्धा आलेले आहेत. रोहितने टी-20 मध्ये 30.19 च्या सरासरीने आणि 135.13 च्या स्ट्राईक रेटने 12,135 धावा केल्या आहेत. रोहितने टी-20 मध्ये 8 शतक आणि 81 अर्धशतक झळकावली आहेत.
रोहित शिवाय विराट कोहली (virat kohli) आणि शिखर धवन (shikhar dhawan) यांनी सुद्धा टी-20 क्रिकेटमध्ये 1100 चौकार झळकावले आहेत. विराट कोहलीच्या नावावर टी- 20 क्रिकेटमध्ये 411 सामन्यांच्या 394 डावात 1195 चौकार आहेत. तसेच शिखर धवनच्या नावावर 334 सामन्यातील 331 डावात 1108 चौकार आहेत.
सर्वाधिक षटकार झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये शिखर धवन पहिल्या स्थानावर आहे, तसेच दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आणि तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर आहे. धवनने आयपीएलमध्ये 768, कोहलीने 756 आणि वॉर्नरने 663 चौकार झुळकावले आहेत. तसेच रोहितच्या नावावर 630 चौकार आहेत. या चार खेळाडूंशिवाय अजून कोणताही फलंदाज आयपीएलमध्ये 600 किंवा त्यापेक्षा अधिक चौकार झळकावू शकला नाही.