Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टीम इंडियाला ‘ओव्हर कॉन्फिडन्ट’ म्हणताच भडकला कॅप्टन रोहित, शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचा घेतला समाचार

March 8, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit Sharma

Photo Courtesy: bcci.tv


भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्याची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील अखेरचा सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याच्या आधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा पत्रकारांना सामोरा गेला. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलेल्या एका वक्तव्याबाबत त्याला विचारले असता, त्याने संतप्त प्रतिक्रिया दिली.

चौथ्या कसोटी सामन्याच्या आदल्या दिवशी रोहित पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याला आगामी सामन्याबद्दलचे काही प्रश्न विचारण्यात आले. एका पत्रकाराने त्याला सांगितले की, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघ अति आत्मविश्वासामुळे इंदोर कसोटी हरला असे म्हणाले. त्यावर रोहितने सडेतोड उत्तर दिले.

रोहित म्हणाला,

“पहिले दोन सामने जिंकून तिसरा सामना गमावल्यानंतर अनेक लोकांना असे वाटते की, आम्हाला अतीआत्मविश्वास झाला आहे. मात्र, या सर्व गोष्टी बकवास आहेत. संघ नेहमीच सर्व सामने जिंकण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी आपल्या बाजूने घडल्या नाही तर पराभव देखील होऊ शकतो. रवी भाई काही दिवसांपूर्वीच या संघाचा भाग होते. त्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे की संघातील माहोल कसा असतो.‌ केवळ तेच नव्हे तर बाहेरचा कोणताही व्यक्ती काय विचार करतो याने आम्हाला फारसा फरक पडत नाही.”

रवी शास्त्री यांनी इंदोर कसोटीत समालोचन करताना भारतीय संघ आत्ममग्न तसेच अति आत्मविश्वास झाल्याचे म्हटले होते. शास्त्री यांनी तब्बल 6 वर्ष भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले आहे. 2021 टी20 विश्वचषकानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

भारतीय संघाने या मालिकेतील पहिले दोन सामने आपल्या नावे केले होते. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पुनरागमन करत विजय संपादन केला होता. आता अखेरचा कसोटी सामना जिंकण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. तसेच, कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी जाण्याची देखील भारतीय संघाला संधी असणार आहे.

(Rohit Sharma React On Ravi Shastri Statement Of Team India Overconfident In Indore Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
होळीच्या रंगात रंगणे एलिस पेरीला पडले महागात; केसांचा रंग बदलताच म्हणाली, ‘मी केस दोन वेळा…’
‘बाबा, तुम्ही चांगलं केलंय…’, सर विवियन रिचर्ड्स यांच्या वाढदिवशी लेक मसाबाची पोस्ट तुफान व्हायरल


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

अहमदाबाद कसोटीसाठी टीम इंडियात होणार बदल? 'हा' खेळाडू करू शकतो पदार्पण, विराटच्या फॉर्मवर...

Suryakumar-Yadav

सूर्यावर कसोटीत अन्याय झाला का? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिले मन जिंकणारे उत्तर

Steve Smith

अहमदाबाद कसोटीआधी कॅप्टन स्मिथने थोपटले दंड! टीम इंडियाला दिले विजयाचे चॅलेंज

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143