Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘बाबा, तुम्ही चांगलं केलंय…’, सर विवियन रिचर्ड्स यांच्या वाढदिवशी लेक मसाबाची पोस्ट तुफान व्हायरल

'बाबा, तुम्ही चांगलं केलंय...', सर विवियन रिचर्ड्स यांच्या वाढदिवशी लेक मसाबाची पोस्ट तुफान व्हायरल

March 8, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Masaba-Gupta-And-Sir-Vivian-Richards

Photo Courtesy: Instagram/masabagupta & officiallyvivian


वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर विवियन रिचर्ड्स यांची गणना जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये होते. त्यांनी आपल्या वादळी फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडला आहे. ते मागील काही काळापासून बरेच चर्चेत आहेत. विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ता हिचे यावर्षी जानेवारीच्या अखेरीस अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्यासोबत लग्न झाले होते. तिच्या लग्नासाठी रिचर्ड्स भारतात आले होते. यादरम्यानचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशात, बुधवारी (दि. 8 मार्च) रिचर्ड्स त्यांचा 71वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी मसाबा गुप्ता हिने खास पोस्ट शेअर केली आहे, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सर्वांना माहिती आहे की, नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स (Neena Gupta And Vivian Richards) यांचे अफेर होते. मात्र, रिचर्ड्स हे आधीपासून विवाहित असल्यामुळे त्यांनी नीना यांच्याशी संसार थाटला नव्हता. सध्या फॅशन डिझायनिंग विश्वात नाव कमावणारी मसाबा गुप्ता (Masaba Gupta) ही याच दोघांची मुलगी आहे. मसाबाने 27 जानेवारीला दुसरं लग्न केलं, तेव्हा रिचर्ड्स भारतात आले होते, त्यावेळी नीना, मसाबा आणि रिचर्ड्स हे त्रिकुट एकाच फ्रेममध्ये दिसलं होतं. अशात विवियन यांच्या वाढदिवसानिमित्त मसाबाने केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.

मसाबाची पोस्ट
मसाबाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली. यामधून तिने दाखवून दिले की, ते जरी अनेक वर्षांपासून तिच्यापासून दूर असले, तरीही ते तिच्या हृदयाच्या खूपच जवळ आहेत. मसाबाने वडिलांसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने भावूक कॅप्शनही लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. तुम्ही चांगलं केलंय. आम्ही खूप चांगलं केलंय. मी तुम्हाला ते सर्व दाखवण्यासाठी आतुर आहे, जे मी कुठल्याही भीतीशिवाय पुढे करत राहील.” यासोबतच तिने केक आणि फुग्याचे फोटोही शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Masaba (@masabagupta)

यातील पहिल्या फोटोत मसाबा वडिलांना मिठी मारताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत मसाबा आणि सत्यदीप मिश्रा (Satyadeep Mishra) दोघेही विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांच्यासोबत दिसत आहेत. मसाबाच्या या पोस्टने सर्वांची मने जिंकली आहेत.

नेहमीच लाईमलाईटमध्ये असते मसाबा
खरं तर, मसाबा सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते. ती तिच्या फोटोंमार्फत लाईमलाईटमध्ये राहते. मसाबाचा ‘मसाबा’ या ब्रँडला जगभरात ओळख मिळाली आहे. खरं तर, ती एक फॅशन डिझायनर आहे. डिझायनिंगच्या दुनियेतून तिने अभिनयक्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. तिने तिच्या ‘मसाबा मसाबा’ या शोमार्फत खास ओळखही निर्माण केली आहे. (actress neena gupta daughter masaba gupta post heartfelt note for her father veteran cricketer vivian richards on 71 birthday)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ओपनिंग पार्टनर म्हणून पेरीने विराट अन् धोनीमध्ये कुणाला निवडले? म्हणाली, ‘मला लय मजा येईल…’
डोंगराएवढं दु:ख पचवल्यानंतर, आभाळाएवढं सुख वाट्याला! ‘हा’ भारतीय क्रिकेटर बनला बापमाणूस


Next Post
Swapnil-Padale

ब्रेकिंग! मुळशी तालुक्यातील नामांकित पैलवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू, तालमीत सराव करतानाच कोसळला अन्...

Ellyse-Perry

होळीच्या रंगात रंगणे एलिस पेरीला पडले महागात; केसांचा रंग बदलताच म्हणाली, 'मी केस दोन वेळा...'

KL-Rahul

'दोनशेच्या स्ट्राईक रेटने खेळायची गरज नाही...', धिम्या फलंदाजीवर राहुलने सोडले मौन; टीकाकारांनाही झापले

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143