भारतात सध्या महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत परदेशी खेळाडूही आपला जलवा दाखवत आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची सर्वात प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंपैकी एक असलेली एलिस पेरी हीदेखील डब्ल्यूपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे. आरसीबी पुरुष फ्रँचायझीमध्ये विराट कोहली संघाचा भाग आहे. अशात पेरी आणि विराटचे एकाच फ्रँचायझीकडून खेळणे, चाहत्यांचा आनंद द्विगुणीत करत आहे. नुकतेच आरसीबीच्या चाहत्यांसाठी फ्रँचायझीने युट्यूबवर पेरीच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूला विराट आणि एमएस धोनी यांच्याविषयी एक प्रश्न विचारला गेला, ज्यावर तिच्या उत्तराने सर्वांची मने जिंकली.
खरं तर, विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. अशात चाहत्यांना त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यामध्ये खूपच रस असतो. चाहत्यांच्या याच मागणीवर एलिस पेरी हिला मजेशीर प्रश्न विचारण्यात आला, जो आता चाहत्यांमध्ये जोरदार व्हायरल होत आहे.
पेरीचे भन्नाट उत्तर
एलिस पेरीला सलामीवीर म्हणून विराट आणि धोनी यांच्यामध्ये कोणाला निवडशील? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना पेरी म्हणाली की, “मी दोघांना एकत्र सलामीसाठी निवडेल. जेणेकरून मी बाहेरून दोघांना एकत्र खेळताना पाहू शकेल आणि त्याचा आनंद लुटू शकेल.”
एलिस पेरीने दिलेल्या प्रश्नाचे उत्तराने वाहवा लुटली आहे. चाहते या व्हिडिओवर सातत्याने कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. खरं तर, एलिस पेरी हिची गणना भारतात प्रसिद्ध असणाऱ्या परदेशी महिला खेळाडूंमध्ये होते. पुरुष क्रिकेटमध्ये एबी डिविलियर्स याचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे.
डब्ल्यूपीएलमधील कामगिरी
आरसीबी संघाच्या डब्ल्यूपीएल 2023मधील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील आरसीबी संघ स्पर्धेत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाला आहे. आरसीबी संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी विराजमान आहे. तसेच, मुंबई इंंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. (who would choose between virat kohli and ms dhoni as the opening partner ellis perrys reply won the hearts see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डोंगराएवढं दु:ख पचवल्यानंतर, आभाळाएवढं सुख वाट्याला! ‘हा’ भारतीय क्रिकेटर बनला बापमाणूस
जसप्रीत बुमराहबाबत मोठी ब्रेकिंग! न्यूझीलंडमधील सर्जरीविषयी महत्त्वाची माहिती आली समोर