वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ४४ धावांनी विजय मिळवला. यासह मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीने एक भन्नाट झेल टिपला होता, जे पाहून रोहित शर्माने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. हे नेहमीच तो मैदानावर सिद्ध करत असतो. वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात देखील अप्रतिम क्षेत्ररक्षणाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने ओडीयन स्मिथचा अप्रतिम झेल टिपला. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
रोहित शर्माने रिॲक्शन होतेय व्हायरल
तर झाले असे की, वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी सुरू असताना ओडीयन स्मिथ तुफान फटकेबाजी करत होता. त्याने ४५ व्या षटकात मिड विकेटच्या दिशेने एक मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न पूर्णपणे फसला चेंडूला लांब न जाता खूप उंच गेला होता. त्यावेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीने अचूक अंदाज घेतला आणि हा झेल टिपला. परंतु झेल टिपत असताना त्याच डोकं खाली आधळलं होतं. हे पाहून कर्णधार रोहित शर्माला आश्चर्य झाले होते. तसेच हा अप्रतिम झेल टिपल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलले होते.
Keeps his calm 😎
Keeps his eyes on the ball 👍
Completes the catch despite a tumble 👌Watch how @imVkohli put in a fantastic fielding effort to dismiss Odean Smith. 🎥 🔽 #TeamIndia #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 9, 2022
भारतीय संघाचा जोरदार विजय
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं तर, या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने तुफानी फटकेबाजी करत ६४ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ९ बाद २३७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून शरमार्ह ब्रूक्सने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर अकील हुसेनने ३४ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिज संघाचा संपूर्ण डाव १९३ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना भारतीय संघाने ४४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
IPL Memories| जेव्हा युवराजसाठी विजय मल्ल्यांनी भर लिलावात घातला गोंधळ
या कॅचला तोड नाही! रिषभ पंतने यष्टीमागे डाईव्ह मारत टिपला ‘सुपरमॅन’ स्टाईल झेल
WWE सुपरस्टार ‘द ग्रेट खली’ भाजपाच्या झेंड्याखाली, दिल्लीत स्विकारले BJPचे सदस्यत्व