भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला गेला. उभय संघातील ही टी-20 मालिका तीन सामन्यांची असून पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार गड्यांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या डावात एक अशी घटना घडली, जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्माने दिलेला एका रिऍक्शनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
ऑस्ट्रेलियन डावाच्या बाराव्या षटकात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ बाद झाला. उमेश यादव गोलंदाजी करत असताना स्मिथच्या बॅटला चेंडूला स्पर्श झाला व तो यष्टीरक्षक कार्तिकने टिपला. पंचांनी मात्र स्मिथला नाबाद ठरवल्याने, भारतीय संघाने त्वरित तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी भारताच्या बाजूने निर्णय दिला. बाद झाल्यानंतर हे स्मिथ नकारार्थी मान हलवत, खेळपट्टीवर उभा होता. त्याच्या याच कृतीमुळे भारतीय कर्णधार रोहित शर्माला हसू आले. रोहित सहज त्याच्याकडे हातद्वारे करत हलकेसे हसला. त्याची हीच प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यावर मजेदार कमेंट येत आहेत. तसेच अनेक मीमदेखील या छायाचित्रावर बनताना दिसतायेत.
https://twitter.com/Richard10719932/status/1572263677340024832?t=TizXsZVsrvT5YDsw36QvQw&s=19
उभय संघातील या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावांचा डोंगर उभारला. केएल राहुलने 55 तर सूर्यकुमार यादव याने 46 धावांचे योगदान दिले. अखेरीस हार्दिक पंड्याने तुफानी फटकेबाजी करत अवघ्या 30 चेंडूवर 71 धावा कुटल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला कॅमेरून ग्रीनने 61 धावांची वादळी खेळी करत सामन्यात कायम राखले. अखेरीस मॅथ्यू वेडने नाबाद 46 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मालिकेतील दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपूर येथे खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकेवेळी अतिशय मोठी शारिरीक समस्या असलेला गेल पुढे झाला ‘युनिवर्सल बॉस’
‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर
अस काय घडलं की भर मैदानात रोहितने पकडला कार्तिकचा गळा? पाहा व्हिडिओ