T20 World Cup 2024: भारतीय संघाने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा 3-0 असा पराभव केला. आता भारतीय संघाची नजर टी-20 विश्वचषकावर आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पण टी-20 विश्वचषकासाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल? मात्र, याच प्रश्नाचे उत्तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने दिले आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आतापर्यंत आम्ही टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची निवड केलेली नाही. पण 8-10 खेळाडू आमच्या मनात आहेत, आम्ही परिस्थितीनुसार आमची प्लेइंग इलेव्हन निवडू. वेस्ट इंडिजमधील खेळपट्टी संथ आहे, त्यामुळे आम्ही आमची प्लेइंग इलेव्हन त्यानुसार निवडू. याबाबत मी प्रशिक्षक राहुल द्रविडशी (Rahul Dravid) बोललो. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात असे अनेक खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते, ते का खेळत नाहीत, हे सांगू शकणार नाही? पण प्रत्येकाला सुखी आणि समाधानी करता येत नाही.” (rohit sharma reaction on indian cricket team players and t20 world cup 2024)
रोहित शर्मा म्हणाला की, “प्रत्येकाला आनंदी ठेवणे सोपे नसते, ही गोष्ट मी माझ्या कर्णधार कारकिर्दीत शिकलो आहे. तुम्ही सर्व 15 खेळाडूंना आनंदी ठेवू शकत नाही, जेव्हा 11 खेळाडू खेळतात आणि 4 बेंचवर बसलेले असतात, तेव्हा ते देखील विचारतात की मी का खेळत नाही.” अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातील विजयानंतर रोहित शर्मा आपले मत व्यक्त करत होता. यावेळी त्यांनी विश्वचषकासाठी संभाव्य संघाबाबतही मत व्यक्त केले. (Can’t keep everyone happy Rohit Sharma’s big statement on T20 World Cup squad selection)
हेही वाचा
AUS vs WI: पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजचा 10 विकेट्सने धुव्वा, आरसीबीने सोडलेल्या गोलंदाजाने केला कहर
मोठी बातमी: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ, मिकी आर्थरसह दोन सपोर्ट स्टाफचा तडकाफडकी राजीनामा