भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकात पूर्णपणे अपयशी ठरला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर बुधवारी (22 मार्च) तिसऱ्या वनडेत देखील सूर्यकुमार ‘गोल्डन डक’ झाला. या तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार एकही धाव करू शकला नाही, त्याचा परिणाम थेट संघाच्या प्रदर्शनावर पाहायला मिळाला. तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ मोठी धावसंख्या करू शकला नाही. असे असले तरी, कर्णधार रोहित शर्मा याने तिसऱ्या वनडेतील पराभवानंतर सूर्यकुमार यादवची पाठराखन केली.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे या मालिकेतील प्रदर्शन पाहिले, तर त्याने तीन सामन्यांमध्ये एकूण तीन चेंडू खेळले आणि प्रत्येक वेळी पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. बुधवारी तिसऱ्या वनडे सामन्यात सूर्यकुमार ऍश्टन एगर (Ashton Agar) याच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 21 धावांनी विजय मिळवला आहे मालिका 1-2 असा विजय मिळवला. मालिका गमावल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सूर्यकुमारची पाठराखण केल्याचे दिसले.
रोहित म्हणाला, “सूर्यकुमार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत फक्त तीन चेंडू खेळू शकला, हे खूप दुर्दैवी आहे. पण हे कोणासोबतही होऊ शकते. तो तीन अप्रतिम चेंडूंवर बाद झाला. त्याने खेळण्यासाठी चुकीचा शॉट निवडला होता. आम्ही त्याला आधीपासून ओळखतो. तो फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळतो. त्यामुळे आम्ही त्याला मागे ठेवले होते, जेणेकरून शेवटच्या 15 ते 20 षटकांमध्ये त्याला मोकळेपणाने फलंदाजी करता येईल.”
“असे असले तरी, सूर्यकुमारकडे गुणवत्ता आणि क्षमता आहे. तो फक्त एका खराब काळातून जात आहे,” असे रोहित पुढे म्हणाला. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमारला तिसऱ्या वनडे सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मात्र सूर्या चौथ्या क्रमांकावर खेळला होता. दरम्यान, उभय संघांतील या शेवटच्या सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 269 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला 270 धावांचे हे लक्ष्य गाठता आले नाही. भारतीय संघाने 248 धावांवर सर्वबाद झाला.
(Rohit Sharma reacts to Suryakumar Yadav being dismissed for a golden duck in all three matches of the ODI series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला नडते फक्त ऑस्ट्रेलियाच! भारतात येऊन पाच वर्षात तीनदा दिलाय धोबीपछाड
रोहित शर्मावर मान खाली घालण्याची वेळ, ऑस्ट्रेलियाकडून कर्णधाराचा मोठा विक्रम मोडीत