कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच क्रिकेटपटू आपापल्या परिवाराबरोबर वेळ घालवत आहेत. तसेच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांनी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत संवाद साधला.
यादरम्यान वॉर्नरच्या (David Warner) एका प्रश्नाचे उत्तर देताना रोहितने (Rohit Sharma) भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला (Shikhar Dhawan) मूर्ख म्हटले आहे. खरंतर एमएस धोनीने (MS Dhoni) रोहितला २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून खेळवले होते.
यावेळी त्याने धवनबरोबर सलामीला फलंदाजी केली होती. तर वॉर्नरनेदेखील आयपीएल फ्रंचायझी सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून खेळताना धवनबरोबर सलामीला फलंदाजी केली होती. त्यामुळे वॉर्नर आणि रोहितला धवनच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल चांगल्याप्रकारे माहित होते.
लाईव्ह सेशनदरम्यान वॉर्नरने त्याच २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल रोहितला विचारले की, धवनने तुलादेखील पहिल्या चेंडूचा सामना करण्यास म्हटले होते का? या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित म्हणाला की, “तो मूर्ख आहे. आता मी काय बोलू शकतो. त्याला पहिल्या चेंडूचा सामना करण्यास आवडत नाही. त्याला फिरकीपटू गोलंदाजांविरुद्ध खेळायला आवडते. परंतु वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळणे त्याला तितकेसे आवडत नाही.”
चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यानचा किस्सा आठवत रोहित म्हणाला की, “२०१३मध्ये पहिल्यांदा मर्यादित षटकांच्या डावाची सुरुवात करण्यासाठी फलंदाजीला उतरलो होतो. एक सलामीवीर फलंदाज म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मी दुसऱ्यांदा सलामीला फलंदाजी करत होतो. आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत होतो. मॉर्ने मॉर्केल आणि डेल स्टेनसारखे गोलंदाज मैदानावर होते. मी नव्या चेंडूने कधीच त्यांचा सामना केला नव्हता. त्यामुळे मी धवनला पहिल्यांदा फलंदाजी करण्यास सांगितले होते. परंतु त्याने असे करण्यास नकार दिला होता.”
“धवन सलग सलामीला फलंदाजी करत होता, तोच आता फलंदाजी करण्यास नकार देतोय? यानंतर मीच पहिल्यांदा फलंदाजी केली. सुरुवातीला गोलंदाजी मॉर्केलने केली होती. परंतु मला चेंडू दिसलाच नाही. मी उसळी चेंडूचा विचार करत होतो. तसेच मी यासाठी तयारही नव्हतो. मला माहित नव्हते की नवा चेंडू कसा असेल आणि तोदेखील इंग्लंडच्या मैदानावर,” असेही रोहित यावेळी म्हणाला.
रोहित पुढे म्हणाला की, “धवनबरोबरचा माझा पहिला अनुभव असाच होता. परंतु आता आम्ही दोघेही एकमेकांबरोबर चांगले जमते. परंतु कधीकधी धवन फार कंटाळवाणा वाटतो.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला हा सामना भारतीय संघाने २६ धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात धवनने ११४ धावा केल्या होत्या. यामध्ये १ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता. तर रोहितने १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
-माजी क्रिकेटपटू म्हणतोय, सौरव गांगुलीच आजपर्यंतचा सर्वोत्तम भारतीय कर्णधार
-७१ शतके करणाऱ्या या दिग्गज क्रिकेटपटूने सुरु केला वाईन बिझिनेस
-हा ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, या बाबतीत एमएस धोनी पाँटिंगपेक्षाही सरस…