भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा गोलंदाजांचा कर्णधार असल्याचे भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाने म्हटले आहे. प्रज्ञान मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.
तसेच प्रज्ञान आणि रोहित अनेक वर्षांपासूनचे मित्र आहे. त्या दोघांनी डेक्कन चार्जर्सकडूनही २००८ ते २०१० पर्यंत एकत्र सामने खेळले आहेत.
स्पोर्ट्सकिडाने दिलेल्या वृत्तानुसार रोहितच्या नेतृत्वाबद्दल ओझा म्हणाला, ‘रोहित हा गोलंदाजांचा कर्णधार आहे. तो गोलंदाजांना समजून घेतो. जर तुम्ही एखाद्या स्पर्धेत गोलंदाजांची काळजी घेतली तर ते गोलंदाजांसाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे तूम्हाला योग्य परिणाम दिसतो.’
‘एमएस धोनी आणि रोहित हे यशस्वी आहेत कारण ते गोलंदाजांची काळजी घेतात. विराटच्याबाबतीत कसोटी आणि वनडेमध्ये तेच आहे. जर तूम्ही गोलंदाजांची काळजी घेतली तर तूम्हाला मदत होते. गोलंदाज २० विकेट्स घेऊन तूम्हाला सामना जिंकवून देतात.’
याबरोबरच रोहितबद्दल बोलताना ओझा पुढे म्हणाला, ‘मी खेळत असताना रोहित हा सर्वात बिंधास क्रिकेटपटू आहे. आता तो कर्णधार म्हणूनही बिंधास आणि निडर आहे. त्याला कशाचीही भीती वाटत नाही. त्याच्याकडे स्वत: ला व्यक्त करण्याचा त्याचा मुंबईचा टिपिकल ऍटिट्यूड आहे.’
रोहित हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. एवढेच नाही तर रोहितने काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक आणि निदाहास ट्रॉफीचे विजेतेपदही जिंकले आहे.
ओझा २०१२ ते २०१५ पर्यंत मुंबईकडून खेळला. तसेच त्याने याचवर्षी फेब्रुवारीमध्ये सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
त्या एका सवयीमुळे रोहितने भारताच्या मोठ्या खेळाडूला म्हटले मुर्ख
माजी क्रिकेटपटू म्हणतोय, सौरव गांगुलीच आजपर्यंतचा सर्वोत्तम भारतीय कर्णधार
७१ शतके करणाऱ्या या दिग्गज क्रिकेटपटूने सुरु केला वाईन बिझिनेस






