मुंबई । रोहित शर्मा आणि शिखर धवन गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीची जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेत. ही जोडगोळ क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दरम्यान, रोहित शर्माने मैदानावरचा एक किस्सा शेअर केला आहे.
बीसीसीआयच्या चॅनलवर ‘ओपन नेट्स विथ मयंक’ या कार्यक्रमात मयंक अगरवाल हा सूत्रसंचालन करत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात इशांत शर्मा गेस्ट म्हणून आला होता तर दुसऱ्या एपिसोडमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन सहभागी झाले. या कार्यक्रमातील एक भाग बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, “2015 साली आम्ही बांगलादेशविरुद्ध सामना खेळता. मी पहिल्या स्लिपमध्ये तर शिखर धवन तिसऱ्या स्लिपमध्ये उभा होतो. अचानक शिखर धवन जोर जोरात गाणे म्हणू लागला. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी धावू लागला. त्यानंतर फलंदाज तमीम इक्बाल हैराण झाला. त्याला समजत नव्हते की या गाण्याचा आवाज कुठून येत होता. त्यानंतर आम्ही सगळे मैदानावर पोट धरून जोरजोरात हसू लागलो.
बीसीसीआयने त्याच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “जेव्हा जटजी आणि हिटमॅन बोलत असतात तेव्हा मनोरंजनाशिवाय दुसरे काही नसते. या मालिकेचा दुसरा भाग लवकरच येत आहे.”
बीसीसीआय खेळाडूंच्या सरावासाठी नियोजनाची तयारी सुरू केली आहे. मालिकेपूर्वी खेळाडूंचे सहा आठवड्याचे सराव सत्राचे नियोजन तयार केले आहे.