---Advertisement---

रोहितने २००७ सालची आठवण काढत आगमी टी२० विश्वचषकासाठी फुंकले रणशिंग, वाचा काय म्हणाला

On: बुधवार, सप्टेंबर 29, 2021 8:28 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी २४ सप्टेंबर २००७, ही तारीख खूप खास आहे, कारण या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली युवा भारतीय संघाने पाकिस्तानला अंतिम फेरीत पराभूत करून प्रथमच टी-२० विश्वचषक जिंकला होता. पाकिस्तानविरुद्ध टी -२० विश्वचषकाची अंतिम लढत अतिशय रोमांचक झाली होती, ज्यात शेवटी भारत जिंकला. १४ वर्षांपूर्वी झालेल्या या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले होते. पहिल्यांदाच झालेल्या या टी२० विश्वचषकात आक्रमक फलंदाज रोहित शर्माही खेळला होता. हा ऐतिहासिक क्षणाची आठवण करुन देत त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

त्याने एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात तो २००७ च्या टी -२० विश्वचषक विजयाचा आनंद त्याच्या सहकारी खेळाडूंसोबत साजरा करताना दिसत आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘२४ सप्टेंबर २००७, जोहान्सबर्ग. या दिवशी करोडो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यावेळी कोणीही विचार केला नसेल की आमच्यासारखा एक अननुभवी तरुण संघ इतिहास घडवेल. त्या क्षणाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हापासून आपण आता खूप पुढे आलो आहोत. आम्ही या काळात अनेक वेळा इतिहास घडवला आहे आणि आम्हाला खूप धक्केही बसले आहेत.’

त्यांनी पुढे लिहिले, ‘आम्ही खूप संघर्ष केला आहे, पण यामुळे आम्ही कधी खचलो नाही, कारण आम्ही कधीही हार मानत नाही. आम्ही आमचे सर्वस्व दिले आहे. पुढील महिन्यात होणारा टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी आणि पुन्हा इतिहास घडवण्यासाठी आम्ही सर्व काही पणास लावणार आहोत. आम्ही येत आहोत आणि हा चषक आमचाच आहे. आम्ही ते शक्य करून दाखवू. ‘

https://www.instagram.com/p/CUZgsRPvRqk/

सध्या, सर्व भारतीय खेळाडू यूएईमध्ये आयोजित आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात व्यस्त आहेत. आयपीएल संपल्यानंतर एक दिवसानंतर टी -२० विश्वचषक सुरू होईल. या वर्षी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये होणार आहे. आधी हा टी -२० विश्वचषक भारतातच खेळला जाणार होता, परंतु कोविड -१९ साथीमुळे तो बाहेर देशात हलवण्यात आला.

हा टी -२० विश्वचषक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित करत आहे. यावेळी या विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहितने यावर्षीच टी२० विश्वचषकात करावे नेतृत्व, तर ‘या’ खेळाडूंचा उपकर्णधारासाठी व्हावा विचार, गावसकरांचे मत

पिरियड्स आल्यानंतर पांढऱ्या जर्सीत खेळताना काय समस्या असतात? इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने सांगितला अनुभव

“तू कोच आहेस, तेवढेच काम कर”, पाँटिंगवर बरसला भारतीय दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---