वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर खेळला गेला. या सामन्यात यजमान संघाने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा उभारल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला.
बरोबरीत असलेल्या टी२० मालिकेत वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना १६४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना भारतासाठी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव व कर्णधार रोहित शर्मा यांनी सलामी दिली. रोहितने एक चौकार व एक षटकार खेचत पाच चेंडूत ११ धावा केल्या. त्याचवेळी दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर अचानक रोहितने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. अधिकच्या सूर्यप्रकाशामुळे व गरमीमूळे त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या नावापुढे रिटायर्ड हर्ट जोडण्यात आले आहे.
भारतीय संघाकडून केल्या गेलेल्या ट्विटमध्ये रोहित पाठीच्या दुखण्यामुळे बाहेर गेल्याचे लिहिले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1554538215482494977?t=H9JqMDn9hMCvDVCluN19qw&s=19
वेस्ट इंडीजची समाधानकारक धावसंख्या
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या वेस्ट इंडिज संघाला कायले मायर्स व ब्रेंडन किंग यांनी अर्धशतकी सलामी दिली. किंग २० धावा करून बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन, रोवमन पॉवेल व शिमरन हेटमायर यांनीही उपयुक्त योगदान दिले. मायर्सने वेस्ट इंडिजसाठी ५० चेंडूवर ८ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडीज संघ निर्धारित २० षटकात १६४ धावा करण्यात यशस्वी ठरला. भारतासाठी भुवनेश्वर कुमारने दोन तर हार्दिक पंड्या व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच! तीन महिन्यात दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, चाहत्यांसाठी क्रिकेटची मोठी पर्वणी
भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक
तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल






