लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (२७ ऑगस्ट) भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि सामन्यात आपले आव्हान कायम ठेवले आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 354 धावांची मोठी आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 बाद 215 धावा केल्या. रोहित शर्माच्या 59 धावांमुळे भारताचे सामन्यात पुनरागमन झाले. पण यामध्ये सर्वात मोठा वाटा होता चेतेश्वर पुजाराचा. तो तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 91 धावांवर नाबाद राहिला.
या सामन्यापूर्वी पुजाराच्या फॉर्मवर सतत टीका होत होत., पण लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने कठीण वेळी धावा करून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले. पुजाराच्या फलंदाजीनंतर रोहित शर्मानेही लोकांना त्याचे महत्त्व आठवून दिले आहे.
लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्माने खुलासा केला की, भारतीय संघाच्या बैठकीत पुजाराच्या फॉर्मवर कधीही चर्चा झाली नाही. रोहित शर्मा म्हणाला, ‘पुजाराचा फॉर्म फक्त शारिरिकदृष्या गेला होता, तो मानसिकदृष्ट्या परिपूर्ण फॉर्ममध्ये होता. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या फलंदाजीबद्दल कधीही चर्चा झाली नाही. लोकांची स्मरणशक्ती बहुधा थोडी कमकुवत आहे. पुजाराने भारतीय संघासाठी वर्षानुवर्षे काय केले याचा त्यांनी विचार करायला हवा.’
रोहित शर्माने सांगितले की, आम्ही या कसोटी सामन्यात फक्त टिकत राहण्यासाठी खेळत नसून जास्तीत जास्त धावा कशा करता येतील? हे आमच्या संघाचे उद्दिष्ट आहे.
तो म्हणाला, ‘आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी खेळत आहोत आणि पुजाराही याच उद्देशाने मैदानावर आला होता. पुजाराच्या बॅटमधून गेल्या काही डावांमध्ये धावा आल्या नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की त्याची गुणवत्ता संपुष्टात आली आहे. तो एक गुणी खेळाडू असून संघाला त्याची गरज आहे.’ तसेच त्याने बोलताना लीड्स कसोटीतील उर्वरित दिवसांसाठीची संघाची रणनीतीही सांगितली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतापुढे अजून मोठे लक्ष्य, मग चौथ्या दिवशी काय असेल फलंदाजांची योजना? रोहितने केला खुलासा
हेडिंग्ले कसोटीत भारताची दुर्गति होण्यास कोहलीचा ‘तो’ निर्णय जबाबदार; माजी क्रिकेटरने टोचले कान
स्टंप्स कुठे? चेंडू कुठे? वादग्रस्त अंपायर्स कॉलमुळे रोहित तंबूत, चाहत्यांसह पत्नी रितीकाही संतप्त