---Advertisement---

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खेळपट्टीची माती का चाखली? रोहित शर्मानं स्वत: केला खुलासा

On: मंगळवार, जुलै 2, 2024 4:15 PM
---Advertisement---

भारतीय संघानं कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक 2024 जिंकला आहे. बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह रोहित शर्माचं भारतीय संघासोबत विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर रोहित शर्मानं मैदानावर एक वेगळंच कृत्य केलं, जे पाहून अनेकांना धक्का बसला. वास्तविक, रोहित शर्मानं विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानाच्या खेळपट्टीची माती चाखली. रोहितचा असं करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल झाला होता. आता स्वतः रोहितनं याबाबत खुलासा केला आहे.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मानं खेळपट्टीची माती का चाखली हे स्पष्ट केलंय. रोहितनं सांगितलं की यात लपवण्यासारखे काही नाही. रोहित म्हणाला, “सर्व काही समोर आहे. मी फक्त त्या क्षणात जगत होतो. जेव्हा मी खेळपट्टीवर गेलो तेव्हा मी पाहिलं की या खेळपट्टीनं आम्हाला ट्रॉफी जिंकून दिली आहे. हे मैदान आणि ही खेळपट्टी मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे मला खेळपट्टीचा काही भाग माझ्यासोबत ठेवायचा होता.”

 

भारतानं 2013 मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून पुढील ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाला तब्बल 11 वर्षे वाट पाहावी लागली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2 आयसीसी फायनल गमावल्या होत्या. मात्र यावेळी टीम इंडियानं कोट्यवधी चाहत्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

या विजयासह रोहित शर्मा, कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर विश्वचषक जिंकणारा केवळ तिसरा भारतीय कर्णधार बनला आहे. कपिल देव यांनी 1983 मध्ये तर धोनीनं 2007 आणि 2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघानंतर राहुल द्रविड आता आयपीएलमध्ये कोचिंग सांभाळतील? आरसीबीसह या 3 टीम आहेत शर्यतीत
प्रशिक्षक भावूक; टीम इंडियाला निरोप देण्यापूर्वी राहुल द्रविडने केले अंतिम भाषण
लागा तयारीला! या दिवशी टीम इंडिया भारतात पोहोचणार, बीसीसीआयनं केली खास विमानाची व्यवस्था

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---