भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. तसेच चौथा कसोटी सामना अहमदाबाद मध्ये खेळवण्यात येणार आहे. ही मालिका संपल्यानंतर या दोन संघात १२ मार्च पासून ५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर २३ मार्चपासून पुण्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या वनडे मालिकेतून भारताचे ३ मुख्य खेळाडू संघाबाहेर होऊ शकतात.
माध्यमांतील वृत्तानुसार वनडे मालिकेसाठी भारताचे रोहित शर्मा, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांना विश्रांती देण्यात येऊ शकते. हे तिघे ही आयपीएल २०२० स्पर्धेपासून सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. तसेच हे तिघेही सतत बायो बबलमध्ये राहून क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे त्यांना संघ व्यवस्थापन विश्रांती देण्याचा विचार करत आहे.
भारतीय खेळाडू आयपीएल २०२० पासून सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. आयपीएलनंतर भारतीय संघ जवळपास तीन महिन्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला होता. हा दौरा संपल्यानंतर लगेचच इंग्लंड संघ भारतात खेळण्यासाठी आला. तसेच इंग्लंड विरुद्ध मालिका संपल्यानंतर आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सतत बायो बबलमध्ये राहिल्यामुळे खेळाडूंना मानसिक तणाव येऊ शकतो आणि खेळाडूंमध्ये थकवा दिसून येऊ शकतो. त्यामुळे खेळाडूंना विश्रांती मिळणे देखील गरचेचे आहे.
चौथ्या कसोटीतून बुमराह बाहेर
शनिवारी( २७ फेब्रुवारी) जसप्रीत बुमराहने बीसीसीआयला मागणी केली होती की, इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातून त्याला काही वैयक्तिक कारणामुळे मुक्त करण्यात यावे. त्याची ही मागणी बीसीसीआयने मान्य केली आहे. यामुळे जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे.
पुण्यात होणार वनडे मालिका
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेतील सामने २३, २६ आणि २८ मार्च रोजी पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हरभजन सिंग बनला ‘ऍक्शन हिरो’! ‘या’ साऊथ फिल्ममध्ये दिसणार फायटिंग करताना, पाहा टीझर
धोनीला खेळताना पहायचं आहे? ‘या’ दिवशी करतोय मैदानात पुनरागमन
भारताविरुद्ध सलग दोन पराभवांनंतर चौथ्या कसोटीआधी इंग्लंड संघात झाले ३ मोठे बदल