---Advertisement---

कोणाच्या खोलीत सर्वात जास्त पसारा असतो? खट्याळ पंतकडून ‘त्या’ आळशी क्रिकेटरची पोलखोल

On: गुरूवार, फेब्रुवारी 10, 2022 12:20 AM
Rohit-Sharma-Rishabh-Pant-Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका अहमदाबाद येथे सुरु आहे. या मालिकेचा दुसरा सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) पार पडला. हा सामना भारताने ४४ धावांनी जिंकला. भारताने दोन्ही सामने जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंत ( Rishabh pant) सलामीवीर म्हणुन मैदानात उतरले. रिषभला मैदानात उतरलेला पाहुन सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. परंतु या सामन्यापुर्वी रिषभने रोहित शर्माच्या एका गोष्टाचा खुलासा केला आहे.

एका वृत्तवाहिनीवर रिषभ पंतची मुलाखत दाखवण्यात आली. त्या मुलाखतीत तो संघातील खेळाडूंबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसला आहे. तेव्हा त्याला विचारण्यात आले की, संघातील कोणाच्या खोलीत सर्वात जास्त पसारा असतो?. तेव्हा त्याने रोहित शर्माचे नाव घेतले.

रिषभ पंत म्हणाला की, “रोहित भैय्याने एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये एक खोली होती त्यामध्ये कचरा होता. ती खोली रिषभ पंतची असल्याचं त्याने म्हटलं होतं. पण ती खोली माझी नसून रोहित भैय्याचीच खोली होती. त्यामध्ये मी बदनाम झालो होते.”

रिषभला मुलाखतीत अनेक मजेदार प्रश्न विचारण्यात आले. त्याला विचारले होते की, संघामध्ये सर्वात छान गायन कोण करते? तर तो म्हणाला माझ्या मते कोणीच नाही, असे म्हणाला. तसेच रिषभने संघातील सर्वात जवळचा मित्र म्हणुन अक्षर पटेलचे नाव घेतले आहे.

रिषभ पंतने मागील एक दोन वर्षांमध्ये भारतीय संघातील आपले स्थान निश्चीत केले आहे. सध्या तो तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये भारतीय संघाचा पहिली पसंती असलेला यष्टीरक्षक आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम खेळी खेळल्या आहेत. एकदिवसीय आणि टी२० मध्येही शानदार डाव खेळले आहेत.

या सामन्यात भारताने ५० षटकात ९ गडी गमावून वेस्ट इंडीजच्या संघासमोर २३८ धावांचं लक्ष्य ठेवले. ज्यानंतर वेस्ट इंडिजला १९३ धावांत सर्वबाद करत भारताने ४४ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात रोहित ५ तर रिषभ १८ धावा करुन बाद झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

विंडीजच्या घातक गोलंदाजालाही नाही घाबरला स्पिनर चहल, बेधडक स्ट्रेट ड्राईव्ह खेळत ठोकला चौकार

भारताच्या ‘त्या’ २ कंजूष वेगवान गोलंदाजांच्या यादीत सामील झाला प्रसिद्ध कृष्णा, केलाय लई भारी पराक्रम

जॉर्ज ऑर्टिझची हॅटट्रिक, एफसी गोवानं मिळवला चेन्नईयनवर मोठा विजय!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---