१३ डिसेंबर २०१७ रोजी मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोशियशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर रोहित शर्माने १५३ चेंडूत २०८ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यावेळी त्याची ती वनडे कारकिर्दीतील तिसरी द्विशतकी खेळी होती.
आजपर्यंत वनडे दोनवेळाही कोणत्या खेळाडूला द्विशतक करता आले नाही तिथं रोहितने तीन शतके केली होती.
त्या सामन्यात समालोचक संजय मांजरेकर हे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी आले होते. तेव्हा भारताला तब्बल १४१ धावांनी विजय मिळवुन देताना सिंहाचा वाटा उचलणाऱ्या रोहितला त्यांच्याकडून तो प्रशन आलाच. रोहित तुझे आवडते द्विशतक कोणते???
तेव्हा रोहितने उत्तर द्यायला थोडी टाळाटाळ केली होती. परंतु पुन्हा मांजरेकर यांनी तोच प्रश्न विचारल्यावर रोहितने श्रीलंकेविरुद्ध केलेल्या २६४ धावा असे सांगितले होते.
परंतु त्यानंतर पुन्हा स्पष्टीकरण देताना रोहित म्हणाला होता की, ” मला माझ्या द्विशतकांची तुलना करायला आवडत नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध जेव्हा मी २०९ धावा केल्या तेव्हा तो सामना हा मालिकेचा निकाल ठरवणार होता. जेव्हा श्रीलंकासंघाविरुद्ध २६४ धावा केल्या तेव्हा मी ३ महिन्यानंतर संघात पुनरागमन केले होते तर ह्या मालिकेची सुरुवात खूप खराब झाली त्यामुळे मालिकेत परतण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. त्यामुळे तिन्ही द्विशतके खास आहेत. ”
रोहितने २ नोव्हेंबर २०१३ रोजी पहिल्यांदा वनडेत द्विशतकी खेळी केली होती. बेंगलोर येथे खेळताना त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५८ चेंडूत २०९ धावा केल्या होत्या.
त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ रोजी त्याने श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे खेळताना १७३ चेंडूत २६४ धावा केल्या होत्या. यात त्याने ३३ चौकार व ९ षटकार मारले होते. रोहित डावातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला होता.
त्यानंतर भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेत त्याने १३ डिसेंबर २०१७ रोजी रोहितने मोहाली येथे १५३ चेंडूत नाबाद २०८ धावांची खेळी करत तिसऱ्यांदा द्विशतक केले होते.
महत्तवाचे लेख
ड्रीम ११: लग्न न झालेल्या क्रिकेटपटूंची टीम इंडिया
ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम…