24 जानेवारीपासून भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र हा दौरा सुरु होण्याआधीच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने तो वनडे आणि टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे.
यामुळे भारतीय संघाची सलामीची जबाबदारी खऱ्या अर्थाने मुंबईकर रोहित शर्मावर आली आहे. टी२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही ५ टी२० सामन्यांची मालिका अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय संघ पहिल्यांदाच ५ टी२० सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यामुळे रोहितच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा असणार आहे.
न्यूझीलंडमधील टी२०तील कामगिरी-
रोहितने न्यूझीलंडमध्ये ४ सामने खेळताना २४च्या सरासरीने केवळ ९६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एक अर्धशतकाचा समावेश आहे. तर तो आजपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध एकूण ९ टी२० सामने खेळला असून त्यात त्याने २४.७५च्या सरासरीने १९८ धावा केल्या आहे. रोहितची आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्द पहाता त्याने न्यूझीलंडविरुद्ध तेवढी चांगली कामगिरी नक्कीच केलेली नाही. परंतु याच खराब कामगिरीची रोहीतला आता परतफेड करण्याची संधी मिळाली आहे.
वनडे पदार्पणासाठी सज्ज झालेला पृथ्वी शाॅची देशांतर्गंत वनडेतील कामगिरी खरंच चांगली आहे का?
वाचा- 👉https://t.co/LOGXOBzgpc👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @PrithviShaw— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
वनडेत धावांचा पाठलाग करताना कोण भारी? सचिन की विराट?
वाचा- 👉https://t.co/nxT1zoAO5i👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @sachin_rt @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
दक्षिण आफ्रिकेला मिळाला नवीन कर्णधार; डूप्लेसिस ऐवजी हा खेळाडू करणार नेतृत्व
वाचा👉https://t.co/BvGtzI7Egt👈#म #मराठी #Cricket #SAvENG @QuinnyDeKock69— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
रॉस टेलर म्हणतो, टीम इंडिया अव्वल क्रमांकाचा संघ, पण…
वाचा👉https://t.co/QTZrFFBnFY👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @RossLTaylor— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020