ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसर्या कसोटी सामन्यावर प्रश्नचिन्ह लागलेले दिसून येतेय. त्याचवेळी, सध्या सिडनीमध्ये असलेला भारताचा प्रमुख फलंदाज रोहित शर्माच्या सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. तो ऑस्ट्रेलियामध्ये आपला विलगीकरण कालावधी पूर्ण करीत आहे. रोहितच्या सुरक्षेविषयी प्रश्न उभे राहिले असताना, आता बीसीसीआयने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
रोहित एकदम सुरक्षित
रोहितच्या सुरक्षेविषयी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला, “रोहित शर्मा सिडनीमध्ये आहे आणि संघ व्यवस्थापन सतत त्याच्या संपर्कात आहे. त्याला सिडनीहून इतरत्र जाण्याची गरज नाही. विलगीकरण कालावधीत तो सुरक्षित आणि जैव-सुरक्षित वातावरणात आहे. तो त्याच्या खोलीत एकटाच असतो. त्यामुळे बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन त्याच्याशी नियमितपणे संपर्क साधतात. जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि आम्हाला असे वाटले असेल की, त्याला सिडनीमधून बाहेर काढावे लागेल तर आम्ही ते त्वरित करू. परंतु, सध्या ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.”
रोहितला सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत
आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर रोहितचा समावेश कसोटी मालिकेच्या अंतिम दोन सामन्यासाठी भारतीय संघात करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया जाण्यापूर्वी रोहितने बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपली तंदुरुस्ती सिद्ध केली होती. ऑस्ट्रेलियात रोहित तंदुरुस्तीची कशी काळजी घेतो हे विचारल्यानंतर, बीसीसीआय अधिकाऱ्याने उत्तर दिले की, “संघाचे फिजिओ त्याच्या सातत्याने संपर्कात रोहितला त्याच्या रूममध्ये त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत ज्या त्याला तंदुरुस्ती वाढवण्यासाठी मदतगार ठरतील. जेणेकरून मैदानात उतरल्यावर त्याची कामगिरी चांगली राहील.”
सिडनी कसोटीच्या आयोजनावर आहे प्रश्नचिन्ह
रविवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी सिडनी येथेच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनी कसोटी सामना ७ जानेवारीपासून खेळला जाईल आणि त्यानंतर अखेरचा कसोटी सामना १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये होईल. कोविड-१९ च्या वाढत्या प्रसारामुळे तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यांच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले की, सध्या असे काहीही होणार नाही. आमची नजर तेथील परिस्थितीवर आहे आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल.”
दुखापतग्रस्त असल्याने रोहितचा आधी भारतीय संघात समावेश नव्हता. परंतु, त्याच्या निवडीवरून वाद झाल्याने व रोहितने तंदुरुस्ती सिद्ध केल्याने त्याला अखेरच्या दोन कसोटीसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. तो या दोन्ही सामन्यात भारतासाठी सलामीवीराची भूमिका बजावेल.
महत्वाच्या बातम्या:
– बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल
– तुम्ही अलिकडे जरा विचित्र वक्तव्य करताय, स्मिथचे ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला जोरदार प्रत्युत्तर
– बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी स्टीव स्मिथचा भारतीय संघाला सल्ला; म्हणाला