इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला बुधवारी (दि. 24 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअम येथे सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून आपल्या सातव्या अंतिम सामन्याकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्स करेल. त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले.
आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी बोलताना तो म्हणाला,
“नेतृत्वाची सुरुवात ही डेक्कन चार्जर्स मधूनच झाली होती. दुसऱ्याच वर्षी म्हणजे 2009 मध्ये त्यांनी मला उपकर्णधार बनवले. एका युवा खेळाडूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देताना, त्यांनी मला भारतीय खेळाडूंशी चांगला समन्वय ठेवण्याची संधी दिली. त्यावर्षी संघाची कामगिरी चांगली झाली आणि आम्ही विजेतेपद पटकावले होते.”
रोहितने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात त्यावेळी डेक्कन चार्जर्स खेळणाऱ्या हैदराबादस्थित फ्रॅंचाईजीसह केलेली. पहिल्या हंगामात आठव्या स्थानी राहिल्यानंतर संघाने जबरदस्त यश मिळवत दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. रोहितला त्यावेळी सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता.
आयपीएल 2011 लिलावात मुंबई इंडियन्सने मोठी बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. त्यानंतर 2013 मध्ये त्याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. रोहितने पहिल्याच वर्षी मुंबईला विजेतेपद मिळवून देत आपले नेतृत्व गुण दाखवले. मुंबईने आतापर्यंत रोहितच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. याव्यतिरिक्त रोहित मागील दीड वर्षापासून भारतीय संघाचा तिन्ही प्रकारचा क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून काम पाहतो.
(Rohit Sharma Said Deccan Chargers Give Me Leadership Chance In IPL 2009)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला रैनासारखे योगदान द्यायचेय”, सीएसकेचा ‘राजकुमार’ ऋतुराजची प्रांजळ कबुली
शेवटी सीएसकेनेच करून दाखवलं! दोन वर्षात पहिल्यांदा गुजरातवर ओढवली ‘ही’ नामुष्की