भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी पुढील दोन महिने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या दोन महिन्याच्या कालावधीत भारतीय संघ आशिया चषक आणि वनडे विश्वचषक खेळेल. भारतीय संघाने सहा वर्षांपासून आशिया चषक तर मागील बारा वर्षांपासून विश्वचषक जिंकलेला नाही. या दोन्ही स्पर्धांमध्ये स्वतः रोहित च्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. इंग्लंडमध्ये झालेल्या मागील विश्वचषकात त्याने दमदार कामगिरी केली होती. त्या कामगिरी मागील यशाचे गमक त्याने नुकतेच सांगितले.
रोहितने नुकतीच आयसीसीला एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने 2019 वनडे विश्वचषकात केलेल्या शानदार कामगिरीचे रहस्य सांगितले. रोहित म्हणाला,
“तो विश्वचषक एक न विसरता येणारा विश्वचषक आहे. त्यावेळी मी डोक्याने अत्यंत शांत होतो. माझा सराव चांगला झालेला आणि मी चांगल्या फॉर्ममध्ये होतो यामुळे इतर विचार डोक्यात येत नव्हते. विश्वचषक स्पर्धा तुम्ही थंड डोक्याने खेळत असाल तर, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो. मला देखील तो फायदा झाला आणि मी सुरुवातच शतक ठोकून केली.”
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. मात्र, उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले. असे असले तरी रोहित या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने संपूर्ण विश्वचषकात तब्बल पाच शतके झळकावलेली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश व इंग्लंडविरुद्ध शतके पूर्ण केली होती. नऊ सामन्यात तब्बल 648 धावा त्याने चोपलेल्या.
(Rohit Sharma Said I Was Very Clear With Mind In 2019 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या-
क्रीडामंत्र्यांवर गांगुलींचा प्रभाव! अवघ्या पाच दिवसात बदलला निवृत्तीचा निर्णय
पाकिस्तान संघाविषयी रोहित काय म्हणाला, ज्यामुळे रितिकालाही नाही आवरले हसू, व्हिडिओ होतोय व्हायरल