भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वनडे आणि कसोटी मालिका संपल्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धची टी-20 मालिका सद्या खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात वेस्ट इंडीजने भारताचा पराभव केला असून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने टी-20 मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात स्वस्तात विकेट गमावली. याच पार्श्वभूनीवर दिग्गज रविचंद्रन अश्विन याने सॅमसनबाबत मोठी भविष्यवाणी वर्तवली आहे.
रविचंद्रन अश्विन () भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असणाऱ्या अश्विनला वाटते की, संजू सॅमसन () भारतासाठी वनडे विश्वचषक 2023मध्ये खेळण्याची शक्यता नाहीये. सॅमसनला राखीव खेळाडू म्हणून संघात घेतले जाऊ शकते, असेही अश्विन म्हणाला. सॅमसन वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत एक अर्धसतक करू शकला होता. पण टी-20मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात त्याची बॅट शांत दिसली.
आपल्या यूट्यूब चॅनलवर अश्विन म्हणाला की, “वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या अनेक खेळाडूंना संधी दिली गेली. संजू सॅमसन त्यापैकीच एक आहे. त्याने या मालिकेत अर्धशतक केले. त्याला मध्यक्रमात संधी दिली गेली होती. आयपीएलमध्ये तो तीन किंवा चार क्रमांकावर फलंदाजी करतो. वनडे क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी शानदार आहे. सरासरी देखील चांगली आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने 50 धावा केल्या. तो खेळपट्टीवर येताच फिरकी गोलंदाजांचा प्रभाव कमी झाला. ही त्याची खासियत आहे.”
“पण भारतीय संघाबाबत बोलायचे झाले, तर सध्या तिसरा आणि चौथा क्रमांका खाली नाहीये. आपल्या सर्वांना सॅमसनची प्रतिभा माहीत आहे. तो कोणत्याही क्षणी सामन्याची दिशा बदलू शकतो. तो एक शानदार खेळाडू आहे. सध्या पहिल्या चार खेळाडूंमध्ये त्याला जागा नाहीये. विश्वचषक झाल्यानंतर किंवा विश्वचषकाच्या एक-दोन वर्षांनीतर त्याला जागा मिळेल का? तर यासाठीही आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.”
“विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार, हे निश्चित आहे. रोहित आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करणार, हेदेखील जवळपास नक्की आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी देखील फिटनेसवर काम केले असून पुनरागमन करणार आहेत. एक राखीव यष्टीरक्षक फलंदाजाची संघाला गरज आहे. असात वनडे संघात ही राखीव यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडू शकतो. ही संघासाठी आणि त्याच्यासाठी चांगली बातमी आहे. मला असेच वाटते की, विश्वचषकाच वेळप्रसंगी सॅमसन संघाच्या उपयोगी पडेल.”
महत्वाच्या बातम्या –
‘सिस्टम कुठेतरी चूकत आहे…’, आयसीसीच्या ‘या’ नियमावर स्टुअर्ट ब्रॉड नाराज
टीम इंडियाचे उपकर्णधार म्हणजे खरा काटेरी मुकुट! असे का म्हणतात? नक्की वाचा