आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्या दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. सूर्यकुमार यादव याच्या वादळी शतकाने आणि गोलंदाजी विभागाच्या भेदक प्रदर्शनाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 27 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्स टॉप थ्री मध्ये आला आहे. या विजयानंतर बोलताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने आपली प्रतिक्रिया दिली.
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना रोहितने आपल्या खेळाडूंचे कौतुक केले. सूर्यकुमार यादव याच्याबाबत बोलताना तो म्हणाला,
“आम्ही डावे उजवे असे समीकरण फलंदाजीत करू इच्छित होतो. तशी योजना आखलेली. मात्र, सूर्यकुमारने स्वतः म्हटले मी जातो. हाच आत्मविश्वास प्रत्येक कर्णधाराला आपल्या खेळाडूंकडून हवा असतो. तो प्रत्येक सामन्यात नवी सुरुवात करतो आणि मागील गोष्टीचा विचार करत नाही. काही वेळा तुम्ही आपल्या आधीच्या कामगिरीवर खुश असता. मात्र, तो तसा नाही.”
सूर्यकुमार यादव याने या सामन्यात अवघ्या 49 चेंडूत नाबाद 103 धावा चोपल्या. यामध्ये 11 चौकार व सहा षटकारांचा समावेश होता. आयपीएल इतिहासातील हे त्याचे पहिलेच शतक ठरले.
हा सामना मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मुंबईने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 218 धावा काढल्या होत्या. मुंबईसाठी अनुभवी सूर्यकुमार यादव याने अवघ्या 49 चेंडूत नाबाद 103 धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर वगळता गुजरातच्या इतर मुख्य फलंदाजांना पूर्णतः अपयश आले. मात्र, राशिद खान याने 32 चेंडूवर 79 धावा चोपत अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु, तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. सूर्यकुमार यादव याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
(Rohit Sharma Said Suryakumar Yadav Said I Will Go When Our Plan Is Left Right Combination In Gujarat Titans Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईला हरवण्यासाठी राशिद खानने मारले तब्बल 10 षटकार, पण सूर्याच्या शतकामुळे मुंबईच विजयी
सूर्याचा स्पेशल सिक्स! शेवटच्या चेंडूवर साकारले पहिले आयपीएल शतक