---Advertisement---

स्वतः कर्णधार रोहित म्हणतोय, “आयपीएल नाही देशासाठी खेळण्यावर लक्ष द्या”; वाचा सविस्तर

On: मंगळवार, फेब्रुवारी 15, 2022 5:10 PM
captain rohit
---Advertisement---

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज (INDvWI) विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. अहमदाबाद येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने शानदार यश मिळवत ३-० असा मालिका विजय साजरा केला. त्यानंतर आता उभय संघांमध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएल व भारतीय संघ यांच्यातील फरक आपल्या खेळाडूंना सांगितला.

काय म्हणाला रोहित

टी२० मालिकेपूर्वी रोहित शर्मा पत्रकारांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. आयपीएलचा मेगा लिलावाबाबत विचारले असता त्याने माहिती दिली की,

“रविवारी लिलाव पार पडल्यानंतर आमची एक बैठक झाली. यामध्ये सर्व खेळाडूंना निक्षून सांगण्यात आले की, पुढील दोन आठवडे तुम्हाला केवळ भारतीय संघाबाबत विचार करायचा आहे. आपले पहिले लक्ष टी२० मालिका जिंकणे असायला हवे. सर्व खेळाडू व्यावसायिक आहेत व त्यांना आपले कर्तव्य देखील माहित आहे. आम्ही केवळ दोन महिने आयपीएल खेळत असतो. उर्वरित, १० महिने देशाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट हेच सर्वांचे प्राधान्य असते.”

बेंगलोर येथे झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात भारतीय संघातील युवा खेळाडू श्रेयस अय्यर, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान व दीपक चहर यांना १० कोटींपेक्षा अधिकची बोली लावली गेली. ईशान १४ कोटी ५० लाख रुपयांसह सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर सुरेश रैना, शाकिब अल हसन, स्टीव्ह स्मिथ व इम्रान ताहीर या खेळाडूंना कोणीही खरेदी केले नाही.

टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा.

महत्वाच्या बातम्या-

याला म्हणतात वफादारी! ‘या’ ५ खेळाडूंनी कधीच दिला नाही संघमालकांच्या विश्वासाला तडा (mahasports.in)

Video: फलंदाज क्रिजपासून लांब असतानाही विकेटकीपरने केले नाही रनआऊट, कारण ऐकून नक्कीच कराल कौतुक (mahasports.in)

राजस्थान रॉयल्सने भारतीय खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर जोफ्रा आर्चरला सोडले, कारण घ्या जाणून (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---