---Advertisement---

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला आली लसिथ मलिंगाची आठवण म्हणाला…

---Advertisement---

मुंबई । लसिथ मलिंगा यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळत नाही. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्‍या 37 वर्षीय मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याने 170 बळी घेतले आहेत. अशा परिस्थितीत चार वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी हा धक्का आहे. गेल्या वर्षीचि चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने कबूल केले आहे की, त्याची टीम श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला मिस करेल.

19 सप्टेंबरला येथे पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जशी सामना करेल. ऑनलाईन पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला,”मला वाटत नाही की, त्यांची जागा भरणे सोपे होईल. तो मुंबईचा मॅचविनर खेळाडू आहे. मी असं बर्‍याच वेळा म्हटलं आहे, जेव्हा जेव्हा आम्ही संकटात सापडतो तेव्हा मलिंगा आम्हाला नेहमीच यातून बाहेर काढत असे. गत वर्षाची कामगिरी पाहता संघ त्याला खूप मिस करेल. त्याची तुलना कोणाशीही करता येणार नाही. त्याच्या अनुभवाची कमतरता भासेल, त्याने मुंबई इंडियन्ससाठी जे केले ते अविश्वसनीय आहे. यावर्षी तो संघात नाही, हे दुर्दैव आहे.”

मलिंगाची जागा कोण घेणार?

तो पुढे म्हणाला, ‘आमच्याकडे जेम्स पॅटिनसन, धवल कुलकर्णी, मोहसीन खानसारखे खेळाडू आहेत. आम्ही मलिंगाऐवजी त्यांना संधी देऊ. पण हे स्पष्ट आहे की, मलिंगाने मुंबईसाठी जे काही केले त्याची तुलना करता येत नाही.’

रोहित शर्मा सलामीला येईल

आपल्या भूमिकेविषयी बोलताना तो डावाची सुरुवात करणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘मी गेल्या वर्षी संपूर्ण स्पर्धेत डावाची सुरूवात केली होती आणि मी पुढेही असेच करीत राहीन. त्याचबरोबर मी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत, संघाला पाहिजे ते करण्यास मी तयार आहे. जेव्हा मी भारताकडून खेळतो, तेव्हा व्यवस्थापनाकडे नेहमीच संदेश देत असतो की सर्व पर्याय उघडे ठेवा आणि मी येथेही करेन.’

चेन्नई सुपरकिंग्जशी स्पर्धा करण्यास सज्ज

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सुरुवातीच्या सामन्याबाबत तो म्हणाले की, ‘संघ आव्हानासाठी सज्ज आहे. सीएसके हा आयपीएलच्या यशस्वी संघांपैकी एक आहे. तुम्ही त्यांना हलके घेऊ शकत नाही. आपल्यापैकी कोणीही बर्‍याच महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नाही, म्हणून प्रत्येकाला विजयापासून सुरुवात करायची आहे. आम्ही दोन संघांदरम्यानच्या चांगल्या सामन्यासाठी आशा बाळगतो आणि संघ म्हणून आपल्याला काय करावे लागेल याकडे फक्त लक्ष दिले पाहिजे.’

ट्रेंडिंग लेख –

हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन

असे ३ खेळाडू, जे राजस्थान रॉयल्सला मिळवून देऊ शकतात दुसरे आयपीएल विजेतेपद

“नवा बोथम” म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफ विषयी १० रंजक गोष्टी

महत्त्वाच्या बातम्या – 

या कारणामुळे चाहते धोनीवर चिडले; सोशल मीडियावर घेतला समाचार

प्रसिद्ध निवेदिका मयंती लँगर कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर; कारणही आहे तसे खास

आयपीएलचा पहिला सामना कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---