रोहित शर्मा याच्या नेतृत्वाती मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जागा पक्की करायची असेल, तर रविवारी (21 मे) विजय महत्वाचा होता. संघाच्या गरजेच्या वेळी रोहितने आपली वादळी खेळी दाखवली. अवघ्या 31 धावांमध्ये रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. सोबतच मुंबई इंडियन्ससाठी आपल्या 5000 धावाही पूर्ण केल्या.
मुंबई इंडियन्सला या सामन्यात विजयासाठी सनरायझर्स हैदराबादकडून 201 धावांचे लक्ष्य मिळाले. रोहित शर्मा (Rohit Sharma) 37 चेंडूत 56 धावा करून झेलबाद झाला. पण यादरम्यान त्याने आयपीएल इतिहासातील खास यादीत जोडले. रोहित शर्मा एका आयपीएल हंगाकडून 5000 धावा करणारा केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने केली होती. विराट कोहली बराच काळ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार राहिला. सध्या रोहित एक फलंदाज म्हणून आरसीबीचे प्रतिनिधित्व करत आहे. तर रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स सर्वाधिक पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ बनला.
रविवारी (21 मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर रोहितने मुंबई फ्रँचायझीसाठी 5000 धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये एका संघासाठी अशी कामगिरी करणारा तो विराट कोहलीनंतर दुसराच फळंदाज ठरला आहे. विराटने आरसीबीसाठी एकूण 7162 धावा केल्या आहेत. (Rohit Sharma scored 5000 Runs for Mumbai Indians.)
एका आयपीएल संघासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
7162 – विराट कोहली – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
5000 – रोहित शर्मा – मुंबई इंडियन्स
4687 – सुरेश रैना – चेन्नई सुपर किंग्ज
4507 – एमएस धोनी – चेन्नई सुपर किंग्ज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईला मिळाला नवा ‘यॉर्कर स्पेशालिस्ट’! मधवालच्या गोलंदाजीपुढे क्लासेन-ब्रूक गुडघ्यावर
‘फ्लॉप’ म्हणलेल्या पूरनने स्वतःला केले सिद्ध! गंभीरने दाखवलेला विश्वास ठरवला सार्थ