---Advertisement---

मुंबईला मिळाला नवा ‘यॉर्कर स्पेशालिस्ट’! मधवालच्या गोलंदाजीपुढे क्लासेन-ब्रूक गुडघ्यावर

---Advertisement---

मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 69 वा सामना रविवारी (21 मे) खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या सलामीवीरांच्या अर्धशतकांच्या जोरावर 200 धावा उभारल्या. एकवेळ 220 पर्यंत चाललेली ही धावसंख्या रोखण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आले. यामध्ये आकाश मधवाल याची निर्णायक भूमिका राहीली.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाला नवी सलामी जोडी मयंक अग्रवाल व विवरांत शर्मा यांनी शतकी सलामी दिली. दोघांनी संघासाठी हंगामातील सर्वोत्तम भागीदारी करताना 140 धावा बनवल्या. त्यानंतर मात्र हैदराबादचा डाव घसरला. युवा आकाश मधवाल याने आपल्या चार षटकांमध्ये केवळ 37 धावा देताना 4 महत्त्वपूर्ण बळी टिपले. आपला पहिलाच हंगाम खेळत असलेला आकाश याने अखेरच्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला.

https://twitter.com/IPL/status/1660251600483647488?t=H1fISubpp-iKjVnZUZA5PQ&s=19

 

मागील सामन्यातच आरसीबी विरुद्ध वेगवान शतक ठोकणाऱ्या हेन्रिक क्लासेन व या हंगामातील पहिले शतक झळकावण्याचा मान मिळवलेल्या हॅरी ब्रुक यांना त्याने लागोपाठच्या चेंडूवर तंबूत पाठवले. 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर क्लासेन व अखेरच्या चेंडूवर ब्रुकचा अगदी धारदार यॉर्कर टाकत त्याने त्रिफळा उडवला. त्याच्याकडे हॅट्रिक घेण्याची संधी असताना देखील त्याला चेंडू टाकता आला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या पुढील सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यास त्याला एका आगळ्यावेगळ्या हॅट्रिकची संधी असेल.

‌आकाश मधवाल याच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करतो. येथे रिलायन्स क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण घेत असताना त्याचा मुंबई इंडियन्स संघात केवळ 20 लाख रुपयांत निवड करण्यात आली. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळताना आठ बळी मिळवले आहेत. जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत आकाश याला मुंबईचा नवा यॉर्कर स्पेशालिस्ट म्हटले जात आहे.

‌(Akash Madhwal Terrific Bowling Against Sunrisers Hyderabad Clean Bowled Klassen And Harry Brook)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 4 वर्षांनंतर रिंकूने केला मोठा विक्रम, रोहित तर सोडाच; धोनी अन् डिविलियर्सलाही टाकलं मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---