मुंबईतील वानखेडे स्टेडिअम येथे रविवारी (दि. 21 मे) आयपीएल 2023चा 69वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात मुंबईपुढे ‘करो वा मरो’ स्थिती आहे. हा सामना जिंकला तरीही मुंबईची जागा प्ले-ऑफमध्ये पक्की होऊ शकत नाही. कारण, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघही या शर्यतीत कायम आहे. मात्र, मुंबई संघ घरच्या मैदानावर दमदार प्रदर्शन करू शकतो. अशात हैदराबादसाठी हा सामना सोपा नसेल.
या हंगामात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आव्हानाचा पाठलाग करताना मोठी धावसंख्या उभारली आहे. अशात म्हटले जाऊ शकते की, एडेन मार्करम (Aiden Markram) याच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyerabad) संघाविरुद्ध मुंबई संघाचे फलंदाज वादळी फलंदाजी करू शकतात. मात्र, प्ले-ऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात मुंबईवर दबाव असेल. मुंबई संघाने 13 सामन्यात 7 विजयासह 14 गुण मिळवले आहेत. तसेच, ते सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहेत. दुसरीकडे, हैदराबादने 13 सामन्यात 4 सामने जिंकत फक्त 8 गुण मिळवले आहेत. ते गुणतालिकेत तळाशी आहेत. आता 69व्या सामन्यासाठी दोन्ही संघ कोणत्या रणनीतीसोबत मैदानात उतरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खेळपट्टी आणि हवामान
वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) येथे दुपारी सामना असल्यामुळे दव असण्याची चिंता नसेल. तसेच, खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली राहील. नाणेफेक जिंकून संघ 200हून अधिक धावा करण्याचा विचार करतील. हवामानाचीही चिंता नसेल. त्यामुळे रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता नाणेफेक होणार आहे. यानंतर सामन्याला 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच, डिजिटल माध्यमांवर हा सामना जिओ सिनेमावर सामन्याचा आनंद लुटता येईल.
उभय संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स
ईशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, टीम डेविड, कॅमरून ग्रीन, ऋतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल
सनरायझर्स हैदराबाद
अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, नीतिश रेड्डी, टी नटराजन (69th match of ipl 2023 mi vs srh preview predicted eleven live streaming know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : चाहत्यांकडून ईडन गार्डन्समध्ये ‘कोहली-कोहली’ नावाची आरडाओरड, नवीनने दिली ‘अशी’ रिऍक्शन
‘आख्ख्या देशाला माहितीये…’, रिंकूचे कौतुक करताना मोठी गोष्ट बोलून गेला कॅप्टन नितीश राणा