दुबई। 14 व्या एशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात साखळी फेरीतील त्यांचा दुसरा सामना बुधवारी, 19 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला.
भारताच्या या विजयात प्रभारी कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक करत मोलाची भूमिका निभावली. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला आहे. तो एशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
त्याने पाकिस्तानविरुद्ध एशिया कपमध्ये 7 सामन्यात खेळताना 42.66 च्या सरासरीने 256 धावा केल्या आहेत. हा विक्रम करताना त्याने भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.
विराटने एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध 4 सामन्यात 63.75 च्या सरासरीने 255 धावा केल्या आहेत. पण त्याला यावर्षी एशिया कपस्पर्धेतून विश्रांती देण्यात आली आहे.
रोहितने बुधवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 39 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. हे त्याचे त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वाद जलद अर्धशतक आहे.
एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज-
256 धावा – रोहित शर्मा (7 सामने)
255 धावा – विराट कोहली (4 सामने)
179 धावा – विरेंद्र सेहवाग (4 सामने)
169 धावा – एमएस धोनी (6 सामने)
159 धावा – सचिन तेंडुलकर (5 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
–एशिया कप २०१८: भारताचा पाकिस्तानवर ८ विकेट्सने मोठा विजय
–Video: मनिष पांडेने घेतला अफलातून झेल, पाकिस्तानच्या कर्णधाराची घेतली विकेट
–एशिया कप २०१८: हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर; टीम इंडियाला मोठा धक्का