भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. अवघ्या 63 चेंडूत रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध आपले 31 वे वनडे शतक साकारले. भारताला या सामन्यात विजयासाठी 273 धावांची आवश्यकता असून रोहित आणि ईशान किशन या सलामीवीर फलंदाजांनी धमाकेदार सुरुवात करून दिली. रोहित यादरम्यान विश्वचषकात सर्वात जास्त शतके करणारा फलंदाज देखील ठरला. सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडीत काढला.
Topping The Charts! ????
Most Hundreds (7️⃣) in ODI World Cups ???? Rohit Sharma
Take a bow! ???? #CWC23 | #TeamIndia | #INDvAFG | #MeninBlue pic.twitter.com/VlkIlXCwvA
— BCCI (@BCCI) October 11, 2023
रोहित शर्मा याच्या वनडे विश्वचषक कारकिर्दीतील हे आतापर्यंतचे सातवे शतक ठरले. यासाठी त्याला अवघे 19 डाव खेळावे लागले. दुसरीकडे सचिन तेंडुलकर याने वनडे विश्वचषकाच्या 44 डावांमध्ये 6 शतके केली आहेत. आता विश्वचषकात सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत सचिन दुसऱ्या, तर रोहित पहिल्या क्रमांकावर आहे.
सोबतच विश्वचषकात सर्वात वेगवान शतक देखील रोहितच्या नावावर झाले आहे. अवघ्या 63 चेंडूत शतक करताच हा विक्रम त्याच्या नावावर झाला. यापूर्वी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता, ज्यांनी 1983 विश्वचषकात अवघ्या 72 चेंडूंमध्ये शतक केले होते. (Rohit Sharma Scored MOST WORLD CUP HUNDREDS TO HIS NAME NOW)
स्पर्धेच्या नवव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, अजमतुल्लाह ओमरजाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
महत्वाच्या बातम्या –
रोहित विराटला सोडा, सचिनच्या मते ‘हा’ आहे भारताचा योद्धा खेळाडू, म्हणाला…
हार्दिक पंड्याने बर्थडे बनवला खास, अफगाणी खेळाडूचा त्रिफळा उडवल्यानंतरची रिएक्शन व्हायरल