दिल्ली। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात काल पार पडलेल्या पहिल्या टी २० सामन्यात रोहित शर्मा भारताने एकूण विजय मिळवलेल्या टी २० क्रिकेट सामन्यात १००० धावा पूर्ण करणारा विराट कोहली नंतर दुसरा खेळाडू ठरला आहे.
या सामन्यात रोहित शर्माने ८० धावांची अर्धशतकी खेळी केली त्याबरोबरच भारताने एकूण विजय मिळवलेल्या टी २० क्रिकेट सामन्यात जवळ जवळ ३८ च्या सरासरीने १०१० धावा पूर्ण केल्या. यात त्याने ४१ सामन्यात १० अर्धशतके केली आहेत.
तसेच विराटने ३४ सामन्यात ६९.५७ च्या सरासरीने १३२२ धावा केल्या आहेत. यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित भारताकडून एकूण ६६ टी २० सामने खेळला आहे. यात त्याने एकूण १४७२ धावा केल्या आहेत. २ ऑक्टबेर २०१५ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या १०६ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
तर विराट भारताकडून ५३ टी २० सामन्यात खेळाला असून त्याने १८७८ धावा केल्या आहेत.
भारताचा न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी २० सामना उद्या राजकोट येथे होणार आहे. भारत ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.