रोहित शर्मा (rohit sharma) भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी रोहितला भारताच्या एकदिवसीय आणि टी२० संघाचे कर्णधारपद देखील सोपवण्यात आले. तत्पूर्वी, त्याने कर्णधाराच्या रूपात स्वतःला सिद्ध केले असल्यामुळे त्याच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. आयपीएलमध्ये रोहित मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाचे नेतृत्व करतो आणि त्याच्या नेतृत्वात संघाने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. रोहितचा मुंबई इंडियन्ससोबचा प्रवास खूप मोठा आहे आणि आता त्याला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. रोहिताने या प्रसंगी मुंबई इंडियन्ससोबच्या त्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला २०११ मध्ये पहिल्यांदा संघात सामील केले होते. त्यापूर्वी तो डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता. मुंबई इंडियन्ससोबत ११ वर्षाचा प्रवास पूर्ण झाल्यामुळे रोहितने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून स्टोरी शेअर केली आहे, तसेच एक व्हिडिओ सुद्ध अपलोड केला आहे. मुंबई फ्रेंचायझीने देखील रोहितसाठी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये रोहितने आयपीएल ट्रॉफी पकडली आहे. फ्रेंचायझीने रोहितच्या फोटोसोबत २०११ मधील एक ट्वीट देखील लावले आहे. फोटोतील हे ट्वीट ८ जानेवारी २०११ मधील आहे. फोटोतील या जुन्या पोस्टमध्ये मुंबई इंडियन्सने लिहिले आहे की, “मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला दोन मिलियनमध्ये विकत घेतले आहे.”
We'll just leave this here 😉💙
11 seasons in Blue and Gold for Our Captain, Our Leader, Our Legend. 🙌#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/zLZQ2I4hDp
— Mumbai Indians (@mipaltan) January 8, 2022
रोहित शर्माचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास २०११ मध्ये सुरू झाला असला, तरी २०१३ मध्ये तो पहिल्यांदा मुंबईचा नियमित कर्णधार बनला. ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉंटिंगने मुंबईचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितला ही जबाबदारी सोपवण्यात आली. कर्णधाराची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच हंगामात त्याने मुंबई इंडियन्सला जेतेपद जिंकवून दिले. पहिल्यांदा जेतेपद जिंकवण्यासाठी मुंबईने एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जला मात दिली होती. त्याच वर्षी मुंबईने रोहितच्या नेतृत्वात चँपियन्स लीगही जिंकली. यानंतर रोहितचा सुवर्णकाळ सुरू झाला आणि तो आजपर्यंतच कायम आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने २०१३ नंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे जेतेपद जिंकले.
महत्वाच्या बातम्या –
…आणि पर्यावरण मंत्र्यातील खेळाडू खूश झाला; थरारक सिडनी कसोटीनंतर आदित्य ठाकरेंचे खास ट्विट
Ashes: ऑस्ट्रेलियाच्या तोंडून विजयाचा घास हिसकावत इंग्लंडने अनिर्णित राखली ‘थरारक’ सिडनी कसोटी
केपटाऊन कसोटीत विराटने ‘एवढ्या’ धावा केल्यावर मोडणार प्रशिक्षक राहुल द्रविडचा विक्रम
व्हिडिओ पाहा –