---Advertisement---

भारताचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबासोबत मग्न, पत्नी रितीकासोबतचे फोटो केले शेअर

On: रविवार, जुलै 24, 2022 3:19 PM
---Advertisement---

एकदिवसीय मालिका सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळली जात आहे (IND vs WI). या मालिकेत शिखर धवन टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. सध्या रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. त्याने पत्नी रितिकासोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहित शर्मा २९ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेपूर्वी संघात सामील होणार आहे. मात्र, तो संघात कधी जाणार आणि त्याची तयारी कधी सुरू करणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी रितिकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सध्या तो परदेश दौऱ्यावर आहे. चाहत्यांनाही रोहितचा हा फोटो खूप आवडला आहे. या फोटोला अवघ्या काही तासांत लाखो लोकांनी लाईक केले आहे. तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहितच्या चाहत्यांनी या फोटोचे जोरदार कौतुक केले आहे.

https://www.instagram.com/p/CgW_7LxquF4/?utm_source=ig_web_copy_link

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी, रोहितने टीम इंडियासाठी शेवटचा टी-२० सामना इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे खेळला होता. शेवटचा एकदिवसीय सामना १७ जुलै रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला गेला होता, त्यानंतर काही वरिष्ठ भारतीय खेळाडूंना वेस्ट इंडिजमध्ये होणार्‍या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. ज्यामध्ये रोहित शर्माचेही नाव आहे. रोहितचा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याने २३३ वनडेत ९३७६ धावा केल्या आहेत. तर १२८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३३७९ धावा केल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘देशासाठी काहीही करायला तयार’, टी२० विश्वचषकापूर्वी कोहलीची हुंकार; वाचा संपूर्ण स्टेटमेंट

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात होणार मोठा बदल! ‘या’ स्टार खेळाडूला मिळणार पदार्पणाची संधी

धवन दुसऱ्या वनडेत पूर्ण करणार अधुऱ्या शतकाची कसर? धोनी, गांगुलीच्या यादीत होणार सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---